Deposits in farmers accounts to compensate for excess rainfall 
कोल्हापूर

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा   

शामराव गावडे

नवेखेड (जि. सांगली) -अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना 63 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. मात्र अद्यापि एक कोटी 20 लाखाचे अनुदान प्रलंबित आहे. 

वाळवा तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात  झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील सोयाबीन, भात, हळद ,आले, द्राक्षे, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोरोनामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या  शेतकऱ्यांचा दृष्टीनं अतिवृष्टी म्हणजे बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था झाली होती. कारण हातातोंडाशी आलेला खरीप मातीमोल झाला होता. काढणीयोग्य झालेली पिके वाया गेली होती. सरकारने अतिवृष्टीमध्ये बाधित पिकांना प्रतिगुठा शंभर रुपये मदतीची घोषणा केली. कृषी व महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी  नियोजन करून पंधरा दिवसात बाधित पिकांचे  पंचनामे केले व तात्काळ अहवाल पाठवला. यामध्ये 1437 हेकटर मधील पिके बाधित झाली. 5843शेतकऱ्यांना  याचा फटका बसला होता. 

पहिल्या टप्प्यात 63 लाख इतकी नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित एक कोटी 20 लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या टप्प्यात जमा होईल
. -भगवानराव माने, तालुका कृषी अधिकारी इस्लामपूर  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT