depreter of zilla parishad changes post in kolhapur zilha parishad changes in new year 
कोल्हापूर

जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाच्या हालचाली वाढल्या ; पदांसाठी होणार रस्सीखेच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने पदाधिकारी बदलाच्या घडामोडींना वेग आला आहे. सध्या तरी पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत. इच्छुक सदस्य नेत्यांना भेटून उमेदवारीची दावेदारी करत आहेत. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पदाधिकारी बदलाचे चित्र स्पष्ट होणार आहे. प्रत्यक्षात बदल नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सभापतिपदांची नावे जवळपास निश्‍चित आहेत, मात्र खरी रस्सीखेच ही अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी होणार आहे.

जिल्हा परिषदेत गतवर्षी भाजपचा पराभव करून महाविकास आघाडी सत्तेत आली. सत्तेत येताना विद्यमान पदाधिकाऱ्यांना एक वर्षाचा कालावधी देण्याचे निश्‍चित झाले आहे. सध्या शिवसेनेकडे तीन सभापतिपदे आहेत. एक पद शेतकरी संघटनेकडे, तर अध्यक्ष काँग्रेस तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे आहे. नवीन रचनेत तीन सभापतिपदे शिवसेनेकडे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणेच शिक्षण, समाजकल्याण व बांधकामचा समावेश आहे.

महिला व बालविकास सभापती पदासाठी रसिका पाटील किंवा विद्या पाटील यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. बांधकाम सभापती पदासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांचा गट आग्रही आहे. या ठिकाणी वंदना जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. अध्यक्ष पद सध्या काँग्रेसकडे आहे. हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या चर्चेतूनच अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्‍चित होणार आहे.

काँग्रेसमधून पांडुरंग भांदिगरे, सरिता शशिकांत खोत यांची नावे आहेत. राष्ट्रवादीतून युवराज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. श्री. पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकामचे सभापतिपद भूषवले आहे. त्यामुळे पाटील यांना पुन्हा संधी देणार की त्यांचा ‘गोकुळ’साठी विचार करायचा, याचा निर्णय नेत्यांना व विशेषत: मुश्रीफ यांना घ्यावा लागणार आहे.

पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे शाहूवाडी येथील एकमेव सदस्य विजय बोरगे, तसेच जयवंतराव शिंपी, परवीन पटेल यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. मुश्रीफ यांनी नुकतेच ओरीजनल ओबीसी यांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुकीचे आरक्षण पाहून ओबीसी झालेल्यांना संधी मिळणार का, हादेखील प्रश्‍न आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT