ajit pawar sakal media
कोल्हापूर

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरमध्ये दाखल

अर्चना बनगे

कोल्हापूर  : खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काल कोल्हापूरचा दौरा करू शकले नाहीत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली, सातारा दौरा केला. आणि आज सकाळीच ते शिरोळमध्ये दाखल झाले. नुकतीच त्यांनी शिरोळ भागातील पूरग्रस्तांची त्यांनी पाहणी केली. थोड्याचवेळात ते कोल्हापूरमध्ये दाखल होतील.

शिरोळ भागाला 2019 मध्ये पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यावेळी मात्र नागरिकांनी लवकरच स्थलांतरित झाल्यामुळे विशेष फटका बसला नाही. त्यांच्याबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित आहेत.त्यानी पूरग्रस्त छावणीस भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी पवार म्हणाले, बाधित व्यक्तींचे पुनर्वसन कसं करायचं हा मोठा प्रश्न शिरोळ भागात आहे. चार महिन्यासाठी आम्ही स्थलांतर करू मात्र राहते घर सोडणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे. यावर ग्रामसभा घेऊन नक्कीच तोडगा काढू. लोकांचे घराचेच नाहीतर शेतीचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहे. यावेळी तातडीची मदत मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे शिरोळ भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शिरोळची पाहणी करून ते साडेनऊ वाजता कोल्हापूर, शाहूपुरी, कुंभार गल्ली येथे व नंतर शिवाजी पुलावर जाऊन पाहणी करणार आहेत. तेथून ते शासकीय विश्रामगृहात बैठक घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT