Ajit Pawar Sabha Surgishwar Matha Nool Gadhinglaj
Ajit Pawar Sabha Surgishwar Matha Nool Gadhinglaj  esakal
कोल्हापूर

बहुजन समाजातील माणसाचं भलं करण्यासाठी राजकारण करणारी आम्ही मंडळी आहोत - अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

देशाला धाडसाने पुढे नेण्यासाठी नेतृत्व करणाऱ्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरे कोणीच दिसत नाही.

नूल : ‘एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा कर्जाची उचल व तारखेच्या घोळामुळे राज्यातील ७० हजारांवर प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजारांच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले. यामध्ये कोल्हापुरातील शेतकऱ्यांची (Farmers in Kolhapur) संख्या मोठी आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू. घड्याळ तेच, पण वेळ नवी आहे. चिन्ह, पक्ष व झेंडा पुढे नेण्याचा निर्धार केला असून, मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही त्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री सुरगीश्वर मठाच्या (Surgishwar Math) सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित शेतकरी मेळावा व नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) अध्यक्षस्थानी होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर झालेल्या या मेळाव्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), कृषिमंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक व सुरगीश्वर मठाचे प्रमुख श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंदगडच्या विकासाला गती दिल्याबद्दल पवार व मुश्रीफ यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार झाला.

पवार म्हणाले, ‘बहुजन समाजातील शेवटच्या माणसाचं भलं करण्यासाठी राजकारण करणारी आम्ही मंडळी आहोत. राजकारणात कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. कोरोनानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. देशाला धाडसाने पुढे नेण्यासाठी नेतृत्व करणाऱ्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरे कोणीच दिसत नाही. येत्या लोकसभेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी राज्यातून अधिकाधिक खासदार पाठवूया.’

कृषिमंत्री मुंडे म्हणाले, ‘महायुती सरकारने रुपयात पीक विमा, नमो शेतकरी योजनेतून सहा हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना देत आहोत. शेती मालाला योग्य किंमत व बाजारपेठ मिळण्यासाठी ४२ कंपन्यांसोबत सरकारने करार केल्याने शेतकऱ्यांत आर्थिक क्रांती घडेल. सुरगीश्वर मठाची शेती सेंद्रीय पद्धतीने करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल.’

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गडहिंग्लजच्या पूर्व भागाला उन्हाळ्यात पाणी कमी पडते. यावर चित्री प्रकल्पाची उंची वाढविण्याबाबत कर्नाटकशी सकारात्मक चर्चा झाली आहे. उंची वाढविण्याने ६५० एमसीएफटी जादा पाणी मिळेल. या प्रलंबित प्रश्नाला चालना देण्याची गरज आहे.’ खासदार मंडलिक यांनी गडहिंग्लजच्या पूर्व भागातील गावांना मुबलक पाणी देण्यासाठी किटवडे धरणाची गरज असून, हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कर्नाटक शासनाशी चर्चा करण्याचे सूचित केले.

आमदार पाटील म्हणाले, ‘उचंगी व आंबेओहोळ प्रकल्पामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला. उपजिल्हा रुग्णालय अत्याधुनिक करण्यात यश आले. बारामती, कागलप्रमाणे गडहिंग्लजच्या औद्योगिक क्षेत्रातही मोठे उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चंदगड मतदारसंघात कृषी विद्यापीठ सुरू करण्याची गरज आहे. ’

यावेळी गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांचेही भाषण झाले. राजेश पाटील-औरनाळकर यांनी स्वागत केले. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक, सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. संजय थोरात यांनी आभार मानले. यावेळी के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैय्‍या माने, रामाप्पा करिगार, बाबासाहेब पाटील-मुगळीकर, संतोष पाटील, सतीश पाटील, सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, आदींसह कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.

गोळीबारप्रकरणी पाठीशी घालणार नाही

पवार म्हणाले, ‘गेल्या अठरा दिवसांत गोळीबाराच्या दोन-तीन घटना घडल्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला. यामध्ये कोणीही मोठ्या बापाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा असला तरी त्याला सरकार पाठीशी घालणार नाही. कायदा सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलिस यंत्रणेला अनेक सुविधा देणार आहोत. पोलिसांनी कोणाच्याही दादागिरीला, गुंडशाहीला आणि दहशतीला बळी न पडता खुलेपणाने काम करावे.’

नाहीतर मेहुणे रुसतील...

आमदार पाटील यांनी विकासकामात अजित पवार, मुश्रीफ यांची साथ मिळाल्याचे सांगितले. मेहुणे खासदार मंडलिक यांनीही निधी दिल्याचे सांगून, त्यांचा उल्लेख केला नाही तर ते रुसतील असे सांगताच एकच हश्‍शा पिकला. चंदगडमधून मला उमेदवारी मिळाली, तेंव्हा मेहुणे मंडलिक शिवसेनेत होते. त्यांनी संग्राम कुपेकरांचा प्रचार केला. मंडलिकप्रेमी कार्यकर्ते मात्र आपल्या दाजीला विसरले नाहीत, अशी टिप्‍पणीही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT