detainees in Kalamba kolhapur Prison get parole
detainees in Kalamba kolhapur Prison get parole 
कोल्हापूर

कोल्हापुरच्या कळंबा कारागृहातील 600 कैद्यांना मिळणार सुट्टी... 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कळंबा कारागृहातील सात वर्षाच्या आतील गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या सुमारे 600 बंदींना पॅरोल (रजा) मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच कच्या कैद्यांपैकी 119 जणांचा जामीन देण्याच्या यादीत समावेश झाला आहे. ही प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून त्यास वरिष्ठांच्या मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने गृह खात्याने कारागृहातील बंदींना जामीन व पॅरोल देण्याचा निर्णय घेतला. कच्या कैद्यांना जामीन तर सात वर्षाच्या आतील गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्यांना 45 दिवसाची रजा (पॅरोल) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गृह खात्याने राज्यभारातील सर्व कारागृहाकडून याबाबतची माहिती मागवली आहे. त्यानुसार कळंबा कारागृहानेही ही माहिती पाठवली आहे. गुरुवारी (ता. 26) याबाबतचा निर्णय झाला. त्यानुसार कळंबा कारागृहात सात वर्षाच्या आतील गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या बंदीची संख्या सुमारे 600 इतकी आहे. त्यांना लवकरच जामीन मिळण्याची शक्‍यता आहे. कळंबा कारागृहात व बिंदू चौक सबजेलमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील कच्चे बंदी आहेत. त्यातील सात वर्षाच्या आतील गुन्ह्यातील कैच्च्या बंदीना तात्पुरता जामीन दिला जाणार आहे. यात दोन्ही ठिकाणचे मिळून 119 बंदीचा समावेश आहे. याबाबत वरिष्ठांकडून जशी मंजुरी मिळते तशी पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. 

78 महिला बंदीना पॅरोल ? 

कळंबा कारागृहात सुमारे 2368 बंदी आहेत. त्यातील 78 महिला बंदीचीही नावे पॅरोल अगर जामीन मिळण्याच्या यादीत समावेश आहे. वरिष्ठांनी त्याला मंजुरी दिली तर त्यांनाही पॅरोल व जामीन मिळण्याची शक्‍यता आहे. 

संचारबंदीची अडचण... 

जामीन व पॅरोलवर सोडण्यात येणाऱ्या बंदीकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. ते या काळात कोठे व कोणत्या नातेवाईकांकडे राहणार याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर तेथील पोलिस ठाण्यात त्यांची हजेरी लावण्यात येणार आहे. मात्र संचारबंदीमुळे बंदींना बाहेर कसे सोडायचे? त्यांच्यावकडून आवश्‍यक बाबी कशा पूर्ण करून घ्यायच्या या अडचणी कारागृह प्रशासनासमोर निर्माण झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT