dhananjay mahadik activities entry in satej patil group 
कोल्हापूर

कोल्हापुरात महाडिक गटाला खिंडार; सुदर्शन पाटील यांचा दोनशे कार्यकर्त्यांसह सतेज पाटील गटात प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर - कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील गडमुडशिंगी गावातील तसेच छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता सर्जेराव पाटील यांचा मुलगा सुदर्शन सर्जेराव पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यानी आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थिती पालकमंत्री सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे.

सुदर्शन पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील गडमुडशिंगीत गेले अनेक वर्षे महाडिक गटाचे नेतृत्व केले आहे. पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलातना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, दक्षिण मतदारसंघासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सातत्याने काम करीत आहोत. आजपर्यंत पालकमंत्री सतेज पाटील तसेच पाटील कुटुंबीयावर कार्यकर्त्यानी ठाम विश्वास ठेवला आहे. येथून पुढेही कार्यकर्त्यांसाठी कुठेही कमी पडणार नाही. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावातील सर्वांनी एकत्र येवून सतेज पाटील गटाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज रहावे.

यावेळी सुदर्शन पाटील म्हणाले, गडमुडशिंगी गावातील विकासासाठी आमच्या विश्वासातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन येथून पुढे पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करू.

यावेळी माजी सभापती प्रदीप झांबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो माळी, रावसाहेब पाटील, विनोद सोनूले, तानाजी धनवडे,बागल कांबळे,सचिन पाटील,सुकुमार देशमुख, उत्तम शिंदे,भानुदास कांबळे,पांडुरंग पाटील,याच्यासह कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT