StarAir Company Dhananjay Mahadik esakal
कोल्हापूर

Dhananjay Mahadik : बंगळूर-कोल्हापूर-मुंबई विमानसेवेबाबत महाडिकांनी दिली महत्त्वाची अपडेट; कधी सुरू होणार Service?

कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दैनंदिन विमानसेवा पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

स्टार एअर कंपनीकडून (Star Air Company) आज नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दैनंदिन विमानसेवा पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्टार एअर कंपनीकडून (Star Air Company) आज नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली.

वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी बंगळूरहून कोल्हापूरकडे विमान उड्डाण घेईल आणि १० वाजून २० मिनिटांनी विमान कोल्हापूरला येईल. त्यानंतर १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूरहून निघालेले विमान मुंबईत ११ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. तर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान कोल्हापुरात ४ वाजून ४० मिनिटांनी पोचेल.

तेच विमान ५ वाजून १० मिनिटांनी बंगळूरला रवाना होईल. दैनंदिन विमानसेवा सुरू झाल्यामुळे, कोल्हापूरच्या उद्योग पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या ही विमानसेवा आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरूवार व शनिवार या चार दिवशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT