Dhananjay Mahadik esakal
कोल्हापूर

खासदार महाडिकांच्या मध्यस्थीमुळं भाजपमधला 'हा' वाद संपुष्टात; बंद खोलीत नाराज पदाधिकाऱ्यांशी चर्चा, नेमकं काय घडलं?

सगळीकडेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार पदाधिकारी निवडी झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'हा वाद आता संपुष्टात आला असून जुने व नवीन कार्यकर्ते एकसंघपणे काम करतील.’

गडहिंग्लज : भाजपतील पदाधिकारी (Gadhinglaj BJP) निवडीवरून जुन्या व नव्या कार्यकर्त्यांत तयार झालेली बेदिली खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या यशस्वी शिष्टाईने संपुष्टात आली. नाराज कार्यकर्त्यांनाही जिल्हा व तालुका कार्यकारिणीत संधी देण्याची ग्वाही दिल्यानंतर नाराजांनी आपल्या बंडाची तलवार म्यान केली.

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी केलेल्या पदाधिकारी निवडीनंतर नाराजीचे पडसाद उमटले होते. हा वाद टोकाला जाऊ नये म्हणून महाडिक यांनी येथील विश्रामगृहात बंद खोलीत नाराजांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष देसाई उपस्थित होते.

सुरवातीला नाराज कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. नव्या निवडींवर नाराजी व्यक्त करत त्या रद्द करून फेरनिवडी करण्याची मागणी केल्याचे समजते. दरम्यान, बैठकीनंतर महाडिक यांनी जुन्या व नव्या कार्यकर्त्यांत समेट झाल्याचे जाहीर केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘सगळीकडेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार पदाधिकारी निवडी झाल्या आहेत. काही ठिकाणी नाराजी आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच काम सुरू आहे. अजूनही जिल्हा व तालुकास्तरावरील काही पदे निवडायची आहेत. तर काही ठिकाणी विस्तार करावयाचा आहे. त्यात जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. तसेच कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी आणि विकासकामे करण्यास मी कटिबद्ध असल्याचे नाराजांना शब्द दिला आहे. त्यामुळे हा वाद आता संपुष्टात आला असून जुने व नवीन कार्यकर्ते एकसंघपणे काम करतील.’

बैठकीस उपस्थित मार्तंड जरळी, मारुती राक्षे, रमेश रिंगणे, आनंद पेडणेकर, चंद्रकांत सावंत, विठ्ठल भमानगोळ आदी नाराजांनी महाडिक यांनी दिलेल्या शब्दानंतर, सक्रीय होऊन पक्षाचे काम सुरू करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी प्रकाश चव्हाण, शिवाजीराव पाटील, भरमू पाटील, हेमंत कोलेकर, संदीप नाथबुवा, महादेव साखरे, संजय बटकडली, आशिष साखरे, संदीप कुरळे आदी उपस्थित होते.

लवकरच कार्यकारिणी विस्तार

दरम्यान, अनंत चतुर्थीनंतर कार्यकारिणी विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे. काही समांतर पदे निर्माण करून तेथे जुन्याना संधी देणार असल्याचेही कळते. तसे झाल्यास काम करताना आणखीन अडचणी वाढण्याचीच शक्यता आहे. किंबहुना नाराजी नाट्यावर आज पडदा टाकला असला तरी भविष्यात एकमेकांची मने जुळणार का? हा प्रश्न कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT