Digital patrolling in Kolhapur city now 
कोल्हापूर

कोल्हापूर शहरात आता डिजीटल पेट्रोलिंग  

राजेश मोरे

कोल्हापूर - नवीन वर्षात आता शहरासह परिसरात डिजीटल पेट्रोलिंग सुरू करण्यात येणार आहे. शहरातील चारही पोलिस ठाण्यांना एक मोबाईल व्हॅनसह चार मोटारसायकल गस्तीसाठी देण्यात येणार आहेत. त्याद्वारे शहरात चौवीस तास गस्त घालण्यात येईल. ही सर्व वाहने कंट्रोलरूमला (100 क्रमांकाला) जोडण्यात येणार आहेत असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. 

शहर परिसरात चेन स्नॅचिंग, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, तोतया पोलिसांकडून गंडा, चोऱ्या अशा घडणाऱ्या प्रकारावर अंकूश ठेवण्यासाठी आता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उपक्रम हाती घेतला आहे. शहर परिसरात चौवीस तास पोलिसांचे पेट्रोलिंगचे नियोजन त्यांनी केले आहे. त्यासाठी शहरातील चारही पोलिस ठाण्याला एक मोबाईल व्हॅन दिली जाणार आहे. तसेच चार मोटारसायकलही देण्यात येणार आहे. ही सर्व वाहने पोलिस मुख्यालयातील कंट्रोल रूम अर्थात 100 नंबरला जोडण्यात येणार आहे. या वाहनांद्वारे पोलिस गर्दीच्या ठिकाणांसह ठराविकवेळी निर्जन होणाऱ्या मार्गावर गस्त घालतील. तीन सत्रात ही गस्त राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

गस्तीची वाहनांना क्‍यूआर कंट्रोलिंग... 
सर्व वाहनांना क्‍यूआर कंट्रोलिंग असल्याने पोलिसांकडून कोणत्या भागात किती वेळ गस्त घातली गेली. याबाबतची तारीख, वेळ व ठिकाणानुसार नोंदींची माहिती संकलित होते. त्यानुसार संबधित बीट मार्शलनीं नियोजित ठिकाणी गस्त घालती की नाही, 100 क्रमांकावर आलेल्या सर्वसमान्यांच्या तक्रारीचे निरसन केले की नाही याच्यावर वरिष्ठांकडून तपासणी केली जाणार आहे. पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व पोलिस उप-अधीक्षकांना याबाबतचे सिस्टीम तपासण्याचे अधिकारही लॉगींग, पासवर्डसह दिले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. 

गस्तीसाठी 200 ते 250 पॉईंट निश्‍चित... 
शहरात गर्दीचे, रहदारीसह चेन स्नॅचिंग, ज्येष्ठांना गंडा घातले गेलेले असे सुमारे 200 ते 250 पॉईंट गस्तीसाठी निश्‍चित करण्यात आले आहेत. यात शाळा, महाविद्यलायांचाही समावेश आहे. याठिकाणी ठरवून दिलेल्या दिवशी व निश्‍चित केलेल्या वेळेत संबधित वाहनांद्वारे गस्त घातली जाईल. 

24 तास गस्त... 
शहर परिसरातील गस्तीचे काम आठ तासाच्या तीन सत्रात केले जाणार आहे. त्यामुळे शहर परिसरात 24 तास पोलिसांचे अस्तित्व दिसणार आहे. पोलिस गस्तच घालत नाही अशी नागरिकांची सातत्याने असलेली तक्रार दूर होऊन शहरातील संभाव्य गुन्हे वेळीच रोखले जाणार असल्याने सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. 

 
शहर परिसरात 24 तास गस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरीता मोबाईल व्हॅनसह चार मोटारसायकल पोलिस ठाण्यांना देण्यात येणार आहेत. ही वाहने कंट्रोलरूमला जोडण्यात येतील. 
-शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT