Dilasadayas: Pollution of rivers will be checked even during monsoons 
कोल्हापूर

दिलासादायक ः पावसाळ्यातही तपासणार नद्यांचे प्रदूषण

युवराज पाटील

कोल्हापूर ः पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता मोजण्यासाठी पाचऐवजी आता दहा दिवसांनी पाण्याचे नमुने घेतले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार दोन टीमच्या माध्यमातून बंधाऱ्यावर जाऊन नमुने घेतले आहेत. 18 जुलैला यातील पहिला टप्पा पार पडला. 
मार्च ते एप्रिलअखेर लॉकडाउनच्या काळात सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे नदी प्रदूषणाची तीव्रता कमी झाली. नदीकाठची वर्दळ बंद झाली. पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जे घटक कारणीभूत आहेत, त्यांचे सांडपाणी कमी झाल्याने पाण्याचा निथळपणा वाढत गेला. या पार्श्‍वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिवाजी विद्यापीठ, तसेच महापालिकेने संयुक्तपणे पंचगंगा खोऱ्यात जाऊन पाण्याचे नमुने घेतले. तपासणीसाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविले गेले. जे निष्कर्ष हाती आले, त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने मेच्या अखेरीस सादर केला. 
मेमध्ये लॉकडाउनमध्ये शिथिलता आली. मार्च एप्रिल तसेच मे मध्ये दर पाच दिवसाला पाण्याचे नमुने घेतले गेले. जूनमध्ये दहा दिवसांतून एकदा नमुने घेण्याचे निश्‍चित केले गेले. जुलैमध्येही लॉकडाउन असल्याने नदीकाठावर लोकांची ये-जा असणार नाही. त्यामुळे या महिन्यातही नमुने घ्या, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. 
हळदी, कांडगाव, आसुर्ले-पोर्ले, पंचगंगा नदीघाट, राजाराम बंधारा, कोगे, बहिरेश्‍वर येथे अलीकडे नमुने घेतले गेले. तेरवाड, हेरवाड, रूई बंधारा येथेही अशाच प्रकारे नमुने घेतले गेले. उन्हाळ्यात पाणी प्रदूषणाची स्थिती काय होती आणि पावसाळ्यातही काय असते, हे तपासण्यासाठी नमुने घेतले जात आहेत. 

पंचगंगेचे पाणी निथळ 
लॉकडाउनमध्ये पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी निथळ बनले आहे. कोल्हापूर शहरातून मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कसबा बावडा येथील एसटीपीला 65 एमएलडी सांडपाणी जाते. लॉकडाउनच्या काळात हेच प्रमाण साठ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. 96 एमएलडी सांडपाण्यापैकी 91 एमएलडी इतक्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

Rajapur Muncipal :. इतिहासाचा प्रवास; राजापूर पालिकेच्या १५० वर्षांची गाथा, ब्रिटिश काळाचा ठसा

SCROLL FOR NEXT