Dilip Patil of Sakal Maratha Samaj in a press conference 
कोल्हापूर

"कार्यकर्त्यांना पोलिसांनी मार्गात अडविण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही"

संदीप खांडेकर

कोल्हापूर : मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या (ता. १४) दसरा चौक येथून कोल्हापूर जिल्ह्यातून पन्नास गाड्यांमधून दोनशे कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कार्यकर्त्यांना पोलिसांनी मार्गात अडविण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
श्री. पाटील म्हणाले, "मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी विविध शासकीय कार्यालयांत नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले मराठा उमेदवार आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. समाज घटक म्हणून त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे.

मराठा तरुणांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गाडी मोर्चा रद्द करून त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहोत. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मुंबईत पोचले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २०० कार्यकर्ते उद्या दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रवाना होत आहेत."


ते म्हणाले, "सारथी संस्थेला गतिमान करणे, आवश्यक आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला, मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित खटले मागे घेण्यासंदर्भात ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. मराठा समाजाची लढाई अद्याप संपलेली नाही. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही." पत्रकार परिषदेत सचिन तोडकर, प्रकाश सरनाईक उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Torrent Project: 'टोरंट'साठी बेसुमार वृक्षतोड! तब्बल ३२ हजार झाडे तोडणार; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल पुन्हा फेल! न्यूझीलंडच्या २०४ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ढेपाळले... Video

Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार पाऊस, ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम

Latest Marathi News Update : ‘मन की बात’ ऐकण्याची विद्यार्थिनींना सक्ती, गैरहजर राहिल्यास दंडाचा इशारा

Nana Patole Statement : २०२४ साली काँग्रेसचे ७५ तर महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडूण आले असते; आयबीच्या रिपोर्टमध्ये उल्लेख, नाना पटोलेंचा दावा

SCROLL FOR NEXT