Hupari Police Station
Hupari Police Station esakal
कोल्हापूर

Hupari Police : सहायक फौजदार लाच घेताना जाळ्यात; पोलिस दलात खळबळ, कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच

सकाळ डिजिटल टीम

संशयित सहायक फौजदार दिलीप तिवडे याने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

हुपरी : गुन्ह्यातील अटकेची कारवाई टाळण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील पोलिस ठाण्यातील (Hupari Police) सहायक फौजदार दिलीप जोसेफ तिवडे (वय ५२, रा. पुण्यपर्व हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. ५०१, कदमवाडी, सरस्वती हॉस्पिटलसमोर, कोल्हापूर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

ही कारवाई काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील जुने बसस्थानक परिसरात झाली. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व शेजारी यांच्यामध्ये कुत्रे चावल्यावरून भांडण झाले होते. याप्रकरणी तक्रारदार व त्यांच्या मुलाच्या विरोधात हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

याप्रकरणात अटकेची कारवाई करीत नाही. तसेच तपासात मदत करण्याचे आश्वासन देत संशयित सहायक फौजदार दिलीप तिवडे याने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती नऊ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचला असता त्यात तिवडे हा अलगद सापडला.

तिवडे याच्या राहत्या घराची झडती घेतली जात असल्याचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, उपनिरीक्षक संजीव बंबर्गेकर, सचिन पाटील, पूनम पाटील, सुनील घोसाळकर, सूरज अपराध, विष्णू गुरव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

थेट पैशांची मागणी

दिलीप तिवडे येथील पोलिस ठाण्यात वर्षभरापूर्वी रुजू झाला होता. डोळ्यांवर नेहमी रेबॅन गॉगल, फिरायला महागडी मोटार, गणवेशाऐवजी कायम टी-शर्ट व जीन्स पॅन्ट अशा वेशात तो असे. कायद्याचा धाक दाखवून थेट पैशांची मागणी करण्याच्या त्याच्या कार्यपद्धतीला लोक कंटाळले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT