Direct Second Year Admission Process Of Polytechnic Started Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

पॉलिटेक्‍निकच्या थेट द्वितीय वर्षाची प्रवेश प्रकिया सुरू... अर्ज भरायला ऑगस्टच्या "या' तारखेपर्यंत आहे मुदत...

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्‍निक) थेट द्वितीय वर्ष प्रवेशप्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पध्दतीने 27 आगस्टअखेर अर्ज करण्याची मुदत आहे. कच्ची गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर होईल. यावर 2 सप्टेंबरअखेर हरकती घेता येतील. पक्की गुणवत्ता यादी 4 सप्टेंबरला असून त्यानंतर पसंतीक्रम भरण्याच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. पसंतीक्रम भरण्याचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर लवकरच जाहीर होणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. 

बारावी विज्ञान, व्होकेशनल, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पॅलिटेक्‍निकच्या थेट व्दितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. त्यातच गेल्या कांही वर्षात अशा विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे प्रथम वर्षाच्या कांही विषयांची लेखी परिक्षा देखील रद्द केली आहे. त्यामुळे बारावीनंतर पॅलिटेक्‍निककडे वळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक तंत्रनिकेतनात प्रवेश क्षमतेच्या दहा टक्के जागा यासाठी राखीव असल्याची माहिती गारगोटीच्या आयसीआरईचे प्रवेशप्रकिया प्रमुख प्रा. दीपक ओतारी यांनी दिली.

प्रथम वर्षातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांच्या रिक्त जागाही बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पॉलिटेक्‍नीक प्रथम वर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांना ई-स्कुटनीचा पर्याय दिला आहे. विद्यार्थ्यांनी https://dsd20.dtemaharashtra.org या संकेत स्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. खुल्या गटासाठी 400, तर मागासवर्गींयासाठी 300 रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पॅलिटेक्‍निक संस्था यासाठी अर्ज सुविधा केंद्र (एफसी) म्हणून काम करणार आहेत. कच्ची गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर होणार असुन यावर 2 सप्टेंबरअखेर हरकत घेण्याची संधी आहे. चार सप्टेंबरला पक्की यादी लागल्यावर पसंतीक्रम भरण्याच्या फेऱ्या सुरू होतील.  

 
संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

Vaibhav Taneja : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चा खजिनदार भारतीय वंशाचा; कोण आहे सीएफओ वैभव तनेजा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'इतका' पाणीसाठा

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनांची यादी जाहीर; कोण ठरणार सर्वोत्कृष्ट? 'या' चित्रपटांमध्ये चुरस

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

SCROLL FOR NEXT