The Director General appreciated to Kolhapur Police 
कोल्हापूर

शब्बास... कोल्हापूर पोलिस, मुंबईत होणार सत्कार...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - किणी टोल नाक्कायावर झालेल्या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिसांचा राज्याचे पोलिस महासंचालक मुंबईत सत्कार करणार आहेत. त्यासाठी या पथकाला तीन फेब्रुवारी रोजी मुंबईत निमंत्रण देण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर तातडीने त्याची माहिती महासंचालकांना देण्यात आली. त्यांच्या वतीने ही माहिती राजस्थान पोलिसांना कळविण्यात आली. अतिशय खतरनाक गॅंग म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा गॅंगमधील गुन्हेगारांना जिवाची पर्वा न करता कोल्हापुरात पकडल्याची राज्याच्या पोलिस महासंचालकांनी तत्काळ दखल घेतली व त्यांना सत्कारासाठी तीन फेब्रुवारीला मुंबईला पाठवावे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना कळवले. श्री. वारके यांनी घटनास्थळी येऊन या पथकाचे कौतुक केले व तीन तारखेच्या मुंबईतील भेटीची माहिती दिली.

कारवाईचे शिलेदार...

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, सत्यजित घुले, पोलिस कर्मचारी नामदेव यादव, पांडुरंग पाटील, रणजित कांबळे, सुरेश पाटील, संतोष माने, सुनील इंगवले, चंदू ननवरे, सुभाष वरूटे, नितीन चौथे, सुजय दावणे, वैभव पाटील, सचिन पाटील आदी या कारवाईचे शिलेदार ठरले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT