Directorate of Sports and Youth Services prepares for Maharashtra's hat-trick in Khelo-India 
कोल्हापूर

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची  खेलो-इंडियात महाराष्ट्राचे हॅट्ट्रिकसाठी तयारी 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : खेलो-इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राची हॅट्ट्रिक करण्याची तयारी सुरू आहे. जिम्नॅस्टिक्‍स, ऍथलेटिक्‍स, कुस्ती, बॉक्‍सिंग, जलतरण व नेमबाजीवर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने लक्ष केंद्रित केले आहे.

प्रतिस्पर्धी हरियानाविरुद्ध येत्या वर्षात टक्कर देण्यासाठी डावपेच आखले जात असून, हरियानात ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2021 ला ही स्पर्धा होणार आहे. 
खेलो-इंडिया स्पर्धेचा 2018 ला नारळ फुटल्यानंतर त्यावर्षी महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. केवळ दोन सुवर्णपदक कमी पडल्याने हरियानाने बाजी मारली. महाराष्ट्रसमोर हरियानाचे तीन स्पर्धेत आव्हान राहिले आहे. 
गुणतक्‍त्यावर लक्ष ठेवून दोन्ही राज्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात कमी पडत नाहीत. महाराष्ट्राने 2019 ला व 2020 ला सलग दोन वर्षे मात्र सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले. क्रीडा संचालनालयाने महाराष्ट्राने 2021 च्या स्पर्धेत हॅट्ट्रिक साधावी, अशी इच्छा आहे. ज्या क्रीडा प्रकारांत महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे, त्या प्रकारांत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी संचालनालय लक्ष ठेवून आहे. त्या त्या प्रकारांतील तज्ज्ञ, जाणकार, अभ्यासक यांच्याशी चर्चा सुरू झाली आहे. खेळाडूंमधील कमतरता दूर करण्यासाठी सरावात कोणता बदल करायला हवा, त्यांचे समुपदेशन कसे करावे, यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. 
ऍथलेटिक्‍स, धनुर्विद्या, कबड्डी, कुस्ती, खो-खो, जलतरण, जिम्नॅस्टिक्‍स, ज्यूदो, टेबल-टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बाक्‍सिंग, लॉनटेनिस, वेटलिफ्टिंग, व्हॉलीबॉल, नेमबाजी, सायकलिंग, हॉकी, लॉनबॉल क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. वर्षांत दोन नव्या खेळांची यात भर पडणार आहे. ते दोन खेळ कोणते, याची खेळाडूंत उत्सुकता आहे. यापूर्वी 2018 ला 16, 2019 ला 18, तर 2020 ला वीस क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश राहिला. 

तीन स्पर्धांत हरियाना व महाराष्ट्रात चुरस राहिली आहे. महाराष्ट्राला हॅट्ट्रिक घडविण्याची संधी आहे. त्यामुळे त्या त्या खेळांतील तज्ज्ञांशी संवाद सुरू झाला आहे.'' 
- अरुण पाटील, कार्यासन अधिकारी, पुणे क्रीडा कार्यालय. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

प्रेक्षकांना कसा वाटला 'मी कात टाकली'चा पहिला एपिसोड? नेटकरी म्हणतात- मुख्य नायिकेचे डोळे बघूनच...

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Marathi News Live Updates: गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबाराचा प्रकार; संजय गायकवाड यांनी कारवाईची केली मागणी

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

SCROLL FOR NEXT