Discomfort In The Family Of Pune Mumbai Servants Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चाकरमान्यांच्या कुटूंबियात अस्वस्थता

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज :  कोरोनाची व्याप्ती हळूहळू वाढू लागली आहे. स्थानिक स्तरावर रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु मुंबई, पुणे या ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड या उपविभागातील अनेकजण नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून बाहेर आहेत. अशांच्या कुटूंबियात अस्वस्थता वाढली आहे. तसेच परदेशस्त असणाऱ्या नातलगाबाबतही तगमग अधिक आहे. रोजच येणाऱ्या नवनव्या संख्येमुळे अशा कुटूंबियांचा जीव टांगणीला लागला आहे. 

पूर्वी पासूनच या परिसरातील अनेकांचा कल मुंबई, पुण्याला नोकरी करण्याकडे आहे. मुख्यतः ग्रामीण भागातील यात संख्या अधिक आहे. गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना विषाणुंच्या रुग्णांची संख्या परदेशासह मोठ्या शहरात वाढू लागली आहे. विविध माध्यमाद्वारे याबाबतच्या बातम्या एका क्षणात पोहोचत आहेत. खासकरून विमानतळ असणाऱ्या शहरात या कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक आहे. त्यामुळेच मुंबई, पुण्याला असणाऱ्यांच्या कुटूंबियात अस्वस्थता सुरु झाली आहे.

परदेशात दुसऱ्या टप्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याचे स्पष्ट झाल्यानेच नातेवाईक चिंतेत आहेत. 
खासगी संस्थांत काम करणाऱ्यांना सोमवारपासून सुट्टी दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे अनेक तरूण मिळेल त्या वाहनाने गावाकडे येत आहेत. पुणे, मुंबई येथील प्रादूर्भावामुळे तेथून येणाऱ्याकडे सर्वच जण संशयाने पहात आहेत. ही बाबही कुटूंबियांच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे. त्यातच शाळा महाविद्यालयाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु येण्यासाठी गाड्यांची संख्या कमी आहे. खागसी वाहन धारक चौपट्टीने दर आकारून प्रवाशांना आणत आहेत. त्याचाही आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो आहे. 

या परिसरातील अनेकजण परदेशात देखील नोकरीला आहेत. बहुतांश दुबई, अरब अमिरात अशा देशात असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा नातेवाईकांची तगमग देखील वाढली आहे. कारण त्या ठिकाणीही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याचे बातम्या येत आहेत. व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून रोजच कुटूंबिय संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच परदेशातून भारतात येणाऱ्या सर्वच विमानांच्या फेऱ्यावर निर्बंध आले आहेत.

साहजिकच परत येण्याची वाट बिकट बनल्याने नातेवाईकात काळजीचा सूर वाढला आहे. त्यामुळेच कोरोनाचे जागतिक संकट लवकर दूर व्हावे अशीच प्रार्थना चाकरमानी आणि परदेशस्त असणाऱ्या कुटूंबियाकडून सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Solapur: पक्षशिस्तीचा भाजपचा दणका! प्रशिक्षण शिबिराला गैरहजर २९ नगरसेवकांना नोटिसा; मंगळवारपर्यंत खुलासा मागवला

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

SCROLL FOR NEXT