Discussion between Dhairyashil Mane and Sanjay Mandlik on water issue of Ichalkaranji city 
कोल्हापूर

इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावर खा.धैर्यशील माने व खा.संजय मंडलीक यांच्यात झालीय 'ही' चर्चा...

सकाळवृत्तसेवा

रुकडी - इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावर नवीन आराखड्यासाठी सुळकुड (ता.कागल) येथील दूधगंगा नदीवरील पाणी योजनेसंदर्भात हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसनेचे खासदार धैर्यशील माने यांनी खासदार प्रा.संजय मंडलीक यांची कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी शनिवार (दि.20) रोजी भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.

दरम्यान, दुधगंगा नदीच्या शिल्लक असलेल्या जादाच्या अडीच टीएमसी पाणी साठ्यामधून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.सध्या इचलकरंजी शहरासाठी अर्धा टीएमसी इतकीच पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे ही योजना झाल्यानंतरही दोन टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी निदर्शनास आणून दिले.तसेच ही योजना राबवीत असताना सुळकूड बंधार्‍याच्या पुढे नवीन बंधारा बांधून त्यातून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा केला जाणार आहे.

त्यामुळे कागल तालुक्यातील पाठीमागील इतर बंधाऱ्यात १२ महिने पाणीसाठा होईल याचा फायदा कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना व जनतेस मिळेल व इचलकरंजी शहराचा पुढील ४० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटेल.यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी यामध्ये सकारात्मक लक्ष घालण्याची विनंती खासदार धैर्यशील माने यांनी खासदार मंडलिक यांचेकडे केली.
 

इचलकरंजी शहराच्या या पाणी योजनेसंदर्भात कागल तालुक्यामधील कार्यकर्त्यांशी दोन दिवसात चर्चा करुन निर्णय घेऊ.
    - खासदार संजय मंडलिक.

कागल तालुक्यातील जनतेवर अन्याय न होऊ देता सुळकुड येथे नवीन बंधारा बांधून इचलकरंजीचा पाणी प्रश्न मार्गी लावू.
     - खासदार धैर्यशील माने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT