Discussion on "Forensic Accounting" with Dr. Apoorva Joshi on "Startup Katta" today 
कोल्हापूर

"स्टार्टअप कट्ट्या'वर आज डॉ. अपूर्वा जोशी यांच्याशी "फॉरेन्सिक अकाउंटिंग'वर चर्चा

प्रतिनिधी

कोल्हापूर,  ः तरुण फॉरेन्सिक अकाउंटंट आणि रिस्क प्रो, माईंड अ रीडर आणि क्विकहिल टेक्‍नॉलॉजिससारख्या प्रायव्हेट आणि लिस्टेड कंपनीच्या संचालिका, महिला उद्योजिका डॉ. अपूर्वा जोशी यांच्याशी "स्टार्टअप कट्ट्या'वर गप्पा मारण्याची संधी उद्या (शनिवारी) मिळणार आहे. ओपेक्‍स स्टार्टअप एक्‍सेलरेटर आणि सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने "स्टार्टअप कट्टा' या ऑनलाईन चर्चासत्राचे तिसरे पुष्प डॉ. अपूर्वा जोशी गुंफणार आहेत. सायंकाळी सात वाजता ओपेक्‍स मीडिया या यूट्यूब चॅनेलवर हा एपिसोड पाहता येणार आहे. 
दर शनिवारी प्रसारित होणाऱ्या "स्टार्टअप कट्ट्या'च्या निमित्ताने उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींशी संवाद साधला जातो. या निमित्ताने त्यांचे अनुभव नवउद्योजकांना ऐकण्याची संधी मिळते आणि स्टार्टअप सुरू करताना त्यांना या अनुभवाच्या शिदोरीचा नक्कीच फायदा होतो. डॉ. अपूर्वा जोशी सुप्रसिद्ध लेखिका रश्‍मी बन्सल यांच्या "अराईज' व "अवेक' या पुस्तकात समाविष्ट झालेल्या एकमेव महिला उद्योजिका आहेत. सध्याच्या काळात फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये बऱ्याच जॉब आणि बिझनेसच्या संधी आहेत. याबाबत मार्गदर्शन डॉ. अपूर्वा जोशी "स्टार्टअप कट्टा' मध्ये करणार आहेत. त्या सध्या इंग्रजी आणि मराठी दैनिकांमध्ये स्टार्टअपविषयी लेखन करतात. तसेच स्टार्टअपसाठी मेन्टॉरिंगसुद्धा करतात. कार्यक्रमाच्या शेवटी विचारलेल्या तीन प्रश्‍नांची उत्तरे देणाऱ्यास "प्लॅन बी स्टार्टअप गाईड' मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT