disrupt the engineering schedule because of corona 
कोल्हापूर

अभियांत्रिकीचे वर्ष होणार कसे ? कोरोनाने गणित विस्कळित

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सीईटीची तारीख अद्याप निश्‍चित नाही. प्रवेशाच्या फेऱ्या किती होणार याबाबत संभ्रम आहे. सप्टेंबर महिन्यात महाविद्यालय सुरू होण्याची शक्‍यता आहेख, तरी अभियांत्रिकीच्या सर्वच वर्षांच्या पहिल्या सेमिस्टारचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, असा प्रश्‍न अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांसमोर आहे.

यंदा कोरोनामुळे सर्वच शैक्षणिक अभ्यासक्रमांना खीळ बसली. अंतिम वर्षांच्या परीक्षा राज्य सरकारने ऐच्छिक केल्या आहेत. पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा रद्द करून सर्वांना उत्तीर्ण केले, मात्र कोरोनाचा सर्वाधिक फटका अभियांत्रिकी महाविद्यालयांना बसला आहे. ऑगस्ट उजाडला तरी अद्याप अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षेची तारीख निश्‍चित नाही. 

परीक्षा झाली तरी प्रवेश प्रक्रियापूर्ण होऊन प्रत्यक्ष पहिले वर्ष सुरू होण्यासाठी सप्टेबरचा शेवटचा आठवडा उजाडेल, असा अंदाज आहे. त्यानंतर लगेचेच दोन महिन्यांनी पहिल्या वर्षाची पहिली सेमिस्टर येईल. अशा वेळी पहिल्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम आणि प्रॅिक्‍टकल कसे पूर्ण करायचे हा महाविद्यालयांसमोर असणारा प्रश्‍न आहे. 

अभियांत्रिकीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि शेवटच्या वर्षाचे वर्गदेखील सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील, असा अंदाज आहे. त्यानंतर लगेच त्यांची सेमिस्टर परीक्षा येईल. त्यांचे प्रॅिक्‍टकल कसे पूर्ण करायचे यासाठी महाविद्यालयांनी नियोजन सुरू केले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम बनवण्याचेही काम महाविद्यालयात सुरू आहे. अशाच पद्धतीने प्रॅिक्‍टकल्स घेता येतील का, याचीही चाचपणी महाविद्यालये करत आहेत. सििव्हल, मेकॅनिक विद्याशाखांचे प्रॅिक्‍टकल ऑनलाईन घेता येणे शक्‍य नसल्याचेही सांगितले जात आहे. एकूणच कोरोनामुळे अभियांत्रिकीचे वेळापत्रक कोलमडणार 
आहे. 

प्रवेशाच्या फेऱ्या कमी करा 

सीईटीनंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर चार ते पाच प्रवेश फेऱ्या होतात. त्यानंतर प्रवेश होईन प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी लागतो. यासाठी प्रेवश फेऱ्या कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यंदा अभियांत्रिकी महाविद्यालये नेहमीपेक्षा उशिरा सुरू होत आहेत. कमी कालावधीत पहिल्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे. याचच एक भाग म्हणून अभ्यासक्रम ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. कालावधी कमी असला तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच अभ्यासक्रमही योग्यप्रकारे पूर्ण होईल. 
- व्ही. व्ही. कार्जिंन्नी, प्रायार्च, के. आय. टी. महाविद्यालय

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

SCROLL FOR NEXT