Distribution Of Solar Lights At Dhangarwada Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

धनगरवाडा उजळला सौर दिव्यांनी

सुनील कोंडुसकर

चंदगड : स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात जंगलाबाहेरचं जग भौतिक साधनांनी संपन्न होत असताना त्यांच्या वस्त्या मात्र दूर्लक्षितच राहिल्या. विकासातील महत्वाचा घटक असलेली वीज त्यांच्यापर्यंत पोहचलीच नाही. अलिकडच्या काळात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढत असताना रात्रीच्या वेळी लाईटचे महत्व वाढले. मागणीही जोर धरू लागली. अशा वेळी पुणे येथील होप फाऊंडेशन, जागृती ग्रुप आणि वेदारंभ ग्रुपच्या सदस्यांनी मदतीचा हात दिला. कर्नाटक सीमेवरील धामणे धनगरवाडा आणि आजरा तालुक्‍यातील पेरणोली धनगरवाड्यावर सौर दिव्यांचे वाटप करण्यात आले. विजयादशीमी दिवशीच या वाड्यांवर दिवाळी साजरी झाली. 

धनगर बांधवांसाठी काम करणारे संजय वाघमोडे यांनी वाडी वस्तीवर फिरत असताना तेथील नागरीकांच्या व्यथा मांडल्या. सामाजिक कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन केले. पुणे येथे नोकरी व्यवसाय करीत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या होप फाऊंडेशन, जागृती व वेदारंभ ग्रुपच्या सदस्यांनी त्याला प्रतिसाद दिला. चंदगड तालुक्‍याच्या सीमेवर कर्नाटकच्या हद्दित वसलेला धामणे धनगरवाडा आणि आजरा व भुदरगड तालुक्‍याच्या सीमेवरील पेरणोली धनगरवाडा दूर्गम असून तिथे वीज पोहोचली नसल्याने तेथील गरजू कुटुंबांना सौर दिवे देण्याचा निर्णय झाला.

पुण्यातील हे कार्यकर्ते सुमारे चारशे किलो मीटरचा प्रवास करुन या वस्त्यांवर पोहोचले. प्रत्यक्ष वस्तीवर जाऊन गरजू 22 कुटुंबांना त्यांनी दिवे दिले. या दिव्यांना चार्जिंग करण्यासाठी सोलर प्लेट आहे. दोन तासात दिवा रीचार्ज होतो. त्यानंतर सुमारे चौदा तास चालतो. त्यावर मोबाईलही रीचार्जिंग करता येतो. त्याचा वापर कसा करायचा याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. वाघमोडे, मनिषा वाघमारे, डॉ. ऋतुराज कदम, अनिकेत गवळी, मयुर बनसोडे यांनी परीश्रम घेतले. 

'त्यांच्य' चेहऱ्यावर उमटलेला आनंद समाधान देऊन गेला
आपल्या उत्पन्नातील काही रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च व्हावी हा उद्देश ठेवून आम्ही काम करतो. सौर दिव्यांचे वाटप केल्यानंतर नागरीकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद समाधान देऊन गेला. 
- मनिषा वाघमारे, पुणे

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT