political news esakal
कोल्हापूर

जिल्हा बँकेचे राजकारण रंगणार; तीन बडे नेते येणार एकत्र ?

सकाळ वृत्तसेवा

निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विकास सेवा संस्था गटातूनच विद्यमान संचालकांविरोधातच इच्छुकांनी सलामी देण्यास सुरुवात केली.

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संचालक पदाच्या जागा मर्यादित आणि प्रत्येक तालुक्यात ढीगभर इच्छुक आहेत. विकास संस्था गटातील काही जागांसह इतर गटातही निवडणूक होण्याची शक्यता आहे. सत्तारूढ गटातून उमेदवारी न मिळालेल्या नाराजांना एकत्र करून स्वतंत्र पॅनेल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पॅनेलचे नेतृत्व आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक हे करण्याची शक्यता आहे. सत्तारूढ आघाडीकडून एक जागा न मिळाल्यास आमदार प्रकाश आबिटकर हेही या आघाडीसोबत जातील, असे सध्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सुरू आहेत; पण निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विकास सेवा संस्था गटातूनच विद्यमान संचालकांविरोधातच इच्छुकांनी सलामी देण्यास सुरुवात केली. त्यातून शिरोळ, राधानगरी, चंदगड, आजरा, गगनबावडा तालुक्यात विरोधी उमेदवारांची घोषणाही विविध माध्यमातून झाली आहे. त्याचबरोबर प्रक्रिया संस्था गटातील विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या उमेदवारीवरून कोरे यांनी सत्ताधाऱ्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पतसंस्था गटातही कोरे यांचे नेतृत्व मानणारे प्रा. जयंत पाटील इच्छुक आहेत, मात्र त्यांच्या नावाला पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जागा वाटपाचा तिढाच सुटला नाही तर कोरे यांच्याकडून विरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे. त्याला महाडिक, आवाडे यांची साथ मिळणार आहे. आवाडे यांच्या गटाचे विलास गाताडे सध्या संचालक मंडळात आहे. त्यांनाही आणखी एक जागा हवी आहे; पण ती मिळणे शक्य नाही. या संदर्भात या तिघांमध्ये दूरध्वनीवरून प्राथमिक चर्चाही झाल्याचे समजते.

‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी, आमदार आबिटकर यांनीही प्रत्येकी एका जागेची मागणी केली आहे. सद्यस्थितीत या दोघांना कोणती जागा द्यायची, याविषयी प्रश्‍नचिन्ह आहे. आबिटकर यांचे बंधू अर्जुन पतसंस्था गटातून इच्छुक आहेत. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. सत्तारूढ गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास अर्जुन आबिटकर रिंगणात असतील. त्यांच्याकडूनही विरोधी आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतला जाईल. भटक्या विमुक्त गटातून श्री. शेट्टी यांच्याकडून संदीप कारंडे यांचीही उमेदवारी निश्‍चित आहे, तेही या आघाडीसोबत येतील, अशी शक्यता आहे.

मुश्रीफ-कोरे रविवारी बैठक

जिल्हा बँकेच्या या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय कोरे यांची पहिली बैठक रविवारी (११) सायंकाळी साडेपाचला शासकीय विश्रामगृहात होणार आहे. त्या बैठकीत मुख्यतः आसुर्लेकर यांच्या उमेदवारीवर चर्चा आहे. चर्चा फिस्कटली, तर मात्र विरोधी पॅनेल निश्‍चित समजले जाते.

विरोधी आघाडीचे संभाव्य उमेदवार

विकास सोसायटी गट : भुदगरड - कल्याणराव निकम किंवा बाबा नांदेकर (आबिटकर गट), आजरा- अशोक चराटी, राधानगरी- अशोक फराकटे (आबिटकर गट), विश्‍वनाथ पाटील (काँग्रेस), आजरा- भरमू पाटील गटाचा उमेदवार, गडहिंग्लज - अप्पी पाटील किंवा आरबोळे.

प्रक्रिया संस्था गट : प्रदीप पाटील-भुयेकर, व्ही. बी. पाटील, पतसंस्था गट - अर्जुन आबिटकर, भटक्या विमुक्त गट - संदीप कारंडे (स्वाभिमानी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT