हसन मुश्रीफ ,समरजितसिंह घाटगे sakal
कोल्हापूर

मुश्रीफांचा मार्ग वन-वे; समरजितसिंह घाटगेंच्या भूमिकेकडे लक्ष

- रमेश पाटील

म्हाकवे (कोल्हापूर) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्यातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा मार्ग सोपा आहे. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार सध्या तरी नाही. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची सोबत आणि माजी आमदार संजय घाटगे यांच्या पाठिंब्यामुळे मंत्री मुश्रीफ यांचा जिल्हा बँकेतील मार्ग वन-वे होऊ शकतो; पण मुश्रीफांचे राजकीय विरोधक भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामविकास व कामगारमंत्री मुश्रीफ, खासदार मंडलिक, माजी आमदार घाटगे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र राहतील. यामुळे मुश्रीफांना तालुक्यामधून बिनविरोधाची संधी आहे. पण त्यांचे राजकीय विरोधक समरजितसिंह घाटगे काय करणार? यावर खूप काही अवलंबून आहे. जिल्हा पातळीवर भाजप काय भूमिका घेणार? यावर घाटगे यांची व्यूहरचना असेल. जरी निवडणूक लागली तरी मुश्रीफांना कठीण जाईल अशी स्थिती नाही.

या निवडणुकीसाठी तालुक्यातून १०७१ संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत. सध्‍या जिल्हा बँकेवर तालुक्यातून चौघेजण प्रतिनिधित्व करतात. यात विद्यमान अध्यक्ष मंत्री मुश्रीफ हे सेवा संस्था गटातून, खासदार प्रा. संजय मंडलिक संस्था गटातून, शेतीमाल प्रक्रिया संस्थांचा प्रतिनिधी म्हणून प्रताप ऊर्फ भैया माने आणि नागरी बँका, पतसंस्था गटातून अनिल पाटील प्रतिनिधित्व करतात. या निवडणुकीत मुश्रीफ, मंडलिक व माने हे तीन उमेदवार निश्चित मानले जातात; मात्र अनिल पाटील यांना पुन्हा संधी मिळणार का? अन्य कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.

दृष्टिक्षेपात कागल तालुका..

* विद्यमान संचालक

- हसन मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक, प्रताप माने, अनिल पाटील

* एकूण पात्र संस्था -१०७१

* सेवा संस्था -१६९

* खरेदी विक्री संघ व प्रक्रिया संस्था -१३४

* नागरी, ग्रामीण पतसंस्था - १४१

*पाणीपुरवठा व इतर संस्था - ६२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT