Diwali Gift To Property Owners In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीतील मिळकतधारकांना दिवाळीची भेट

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : महाराजस्व अभियानाअंतर्गत इचलकरंजी येथील नगरपालिका हद्दीतील चुकून लागलेले "ब' सत्ताप्रकार कमी करण्याचा आदेश प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी आज दिले. एकूण 40 सिटी सर्व्हे सर्वेक्षण आणि टिपी स्किमवरील 114 मिळकतधारकांना ही दिवाळीची भेट मिळाली आहे. 

इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील काही सिटी सर्व्हे क्रमांक "ब' सत्ता प्रकारचे आहेत. त्याचप्रमाणे काही सिटी सर्व्हे क्रमांकाच्या मिळकती या "ब' सत्ता प्रकारच्या नसतानाही चुकून "ब' सत्ता प्रकार नमूद झालेला आहे. "ब'सत्ता प्रकार कमी करण्याबाबत मिळकतधारकांना नव्याने प्रस्ताव दाखल करावा लागतो. हा प्रस्ताव नगरभूमापन अधिकारी यांच्याकडून तपासून घेतला जातो व चुकून लागेला "ब' सत्ता प्रकार कमी करण्याची कार्यवाही केली जाते.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बैठक घेऊन याबाबत सूचना दिली होती. त्याचबरोबर महाराजस्व अभियानांतर्गत चुकून लागलेले "ब' सत्ता प्रकार कमी करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. या कार्यवाहीस अनुसरून नगरभूमापन अधिकारी यांच्या अहवालानुसार चुकून लागलेला "ब' सत्ता प्रकार कमी करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी आज दिले. 

हा आदेश उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे दिला असून, कागदपत्रातील कोणतीही माहिती खोटी असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा या कागदपत्राविरुद्ध पुरावा दाखल झाल्यास हा आदेश रद्द करण्यात येऊन त्या अनुषंगाने होणाऱ्या परिणामास संबंधित पात्र राहतील, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. नगरभूमापन अधिकारी शशिकांत पाटील यांनी हा प्रस्ताव तपासून पाठवला होता. तसेच अपर तहसीलदार शरद पाटील यांचेही यामध्ये योगदान राहिले आहे. 

मिळकतधारकांची त्रासातून सुटका 
या आदेशामुळे मिळकतधारकांना खरेदी-विक्री करताना अथवा कर्ज काढताना आता त्रास सहन करावा लागणार नाही. एकूण 114 मिळकतधारकांना याचा लाभ होणार असून, हा आदेश त्यांच्यासाठी दिवाळीची भेट ठरला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT