kaushiki jadhav sakal
कोल्हापूर

शाब्बास पोरी! ऑस्ट्रेलियातील उच्चशिक्षणासाठी इचलकरंजीच्या कौशिकी जाधवची निवड

डीकेटीई’च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कौशिकी जाधव हिची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित विद्यापीठात निवड

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कौशिकी जाधव हिची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित विद्यापीठात निवड झालेली आहे. विशेष म्हणजे तिला सुमारे ८३ लाख रुपयांची शिष्यवृत्ती केंद्र सरकारमार्फत मिळालेली आहे.

कौशिकीने परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयएलटीएस परीक्षेत यश संपादन केले आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या समकक्ष परीक्षेसाठी ‘डीकेटीई’मध्ये वेळोवेळी तज्ज्ञ प्राध्यापकांचे गेस्ट लेक्चरचे आयोजन केले जाते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या स्वायत्त अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी मशिन टूल्स ॲण्ड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टिस, टूल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स, ऑ‍ॅटोमेशन, रोबोटिक्स, मशिन डिझाईन या विषयांचा तिला या निवडीसाठी फायदा झाला.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, सचिव डॉ. सपना आवाडे यांनी तिला शुभेच्छा दिल्या. याबाबत संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. आर. नाईक, प्रा. आर. डी. पाटील, प्रा. एस. ए. सौंदत्तीकर आदींचे मार्गदर्शन लाभले. निवडीसाठी प्रा. अभय केळकर (कोल्हापूर) यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT