Do doctors come, do they check? ... How is the meal? 
कोल्हापूर

डॉक्‍टर येतात का, तपासतात का?...जेवण कसे आहे? 

शिवाजी यादव

कोल्हापूर : "डॉक्‍टर येतात का... तपासतात का... जेवण कसे आहे.. नाश्‍त्यामध्ये काय देतात.. काही अडचण आहे का.. समाधानी आहात ना..' अशा शब्दात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज अचानकपणे सीपीआरला भेट देवून थेट बाधित रुग्णांशी संवाद साधत वस्तुस्थिती जाणून घेतली. 

सायंकाळी सातच्या सुमारास देसाई यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची वाहने नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात न जाता अचानकपणे दसरा चौकाकडे वळली. काही वेळातच ती वाहने सीपीआरमध्ये दाखल झाली. याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे या व्हीसीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

याठिकाणी त्यांच्याशी चर्चा करुन श्री. देसाई आणि डॉ. कलशेट्टी यांनी डॉ. अनिता सैबन्नावर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांच्यासोबत अतिदक्षता विभाग, हिमो डायलेसिस विभाग, ट्रॉमा सेंटर आदींची पाहणी करुन उपचार घेत असणाऱ्या कोरोना रुग्णांशी थेट संवाद साधला. 

रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा, उपचार आणि जेवणाचा दर्जा याबाबत सविस्तर माहिती एका पुरुष आणि महिला रुग्णांकडून जाणून घेतली. नाश्‍त्यासह योग्य आहार पुरवला जात असून डॉक्‍टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची समाधानकारक माहिती रुग्णांनी यावेळी दिली.

याचवेळी रात्रपाळीसाठी येणाऱ्या परिचारिकांशी डॉ. कलशेट्टी यांनी संवाद साधून त्यांना योग्य ती काळजी घेण्याबाबत सांगितले. रुग्णांचा स्वॅब घेतल्यापासून त्यांच्याबाबत पुढील होणाऱ्या कार्यवाहीबाबत आणि यंत्रणेबाबत जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांनी यावेळी प्रत्यक्ष भेटीत जाणून घेतल्या. 

"डायलेसिस'मध्ये अतिदक्षता विभाग करा... 
डायलेसिस विभागात अतिदक्षता विभाग करण्याबाबत सूचना करून "महात्मा जोतिराव फुले जीवनदायी' योजनेत समावेश असणाऱ्या रुग्णालयांपैकी खासगी रुग्णालयात या विभागातील रुग्णांना उपचारासाठी पाठविण्याबाबतची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. कोरोना रुग्णांसाठीची उपचार सुविधा, डॉक्‍टर्स आणि कर्मचारी यांच्यासाठीची आरोग्य सुविधा यासह मनुष्यबळ वाढविण्याबाबतही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि डॉ. सैबन्नावर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

अरे वाह! 'पारु' मालिकेनंतर प्रसाद जवादेला मिळाली नवी मालिका, पूर्वा कौशिकसोबत नवी जोडी, प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

SCROLL FOR NEXT