doctor commits suicide by tearing stomach due to intolerance 
कोल्हापूर

पोटदुखी सहन न झाल्याने पोट फाडून घेऊन डॉक्‍टरची आत्महत्या

शैलेश पेटकर

संख (जि. सांगली)  : जत तालुक्‍यातील संख गावात एका ज्येष्ठ डॉक्‍टरनी पोटदुखी सहन न झाल्याने स्वतःचे पोट फाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

डॉ. सदाशिव आमगोंडा व्हनखंडे (वय 68) असे त्यांचे नाव आहे. ते येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी होते व सध्या गावात खासगी दवाखाना चालवत होते. 

डॉ. व्हनखंडे यांना गेल्या कित्येक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता. त्यावर वेगवेगळे उपचारही करून घेतले होते. काल, सोमवारी रात्री पत्नी, मुले झोपी गेल्यानंतर त्यांनी नैराश्‍यातून आत्महत्या केली.

रात्री एकच्या सुमारास राहत्या घरी स्वतःचे पोट फाडून घेतले. कुटुंबीयांनी हे दृश्‍य पाहून आक्रोश केला. घटनास्थळी उमदी पोलिस दाखल झाले. उमदी येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला. 

डॉ. सदाशिव व्हनखंडे हे संख प्राथमिक आरोग्य केंद्रात दीर्घकाळ कार्यरत होते. शासनाच्या धोरणानुसार निवृत्तीनंतरही त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. या वयातही त्यांनी निष्ठेने आणि सचोटीने सेवा केली. निवृत्तीनंतर संख येथे स्वतंत्र खासगी दवाखाना चालवला.

त्यांनी आत्महत्येपूर्वी भुलीचे इंजेक्‍शन घेतले होते. त्यानंतर चाकूने पोट फाडून घेतले. त्यातूनही जीव गेला नाही. त्यानंतर दुचाकीतील पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या आत्महत्येने संख व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT