The doctor at CPR was annoyed by this, not by the work 
कोल्हापूर

सीपीआरमधील डॉक्‍टर कामाने नाही तर या गोष्टीमुळे वैतागले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः कोल्हापूर बाहेरून येणाऱ्या रुग्णांना सीपीआरमध्ये तपासणीसाठी आणल्यानंतर आपल्या माणसांची लगेच तपासणी करून त्यांना तातडीने घरी सोडून द्या, असा दबाव राजकीय व्यक्ती व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. रोज येणाऱ्या अशा फोनने सीपीआरमधील डॉक्‍टरही वैतागले असून, इतरांना किमान तीन-चार दिवस ठेवावे लागत असताना अशा फोनवरून सोडून देणाऱ्यांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशभर लॉकडाउन आहे. 3 मेपर्यंत हा लॉकडाउन कडक होता; पण केंद्राने 17 मेपर्यंत हा लॉकडाउन कायम ठेवताना काही प्रमाणात त्यात शिथिलता आणली आहे. त्यानुसार रेड झोन वगळता इतर जिल्ह्यांत अडकून पडलेल्या कोल्हापूरवासीयांना शहरात येण्याची मुभा दिली आहे. बाहेरून आलेल्या सर्वांची सीपीआरमध्ये तपासणी केल्यानंतर त्यांचा स्वॅबचा अहवाल आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

एकीकडे बाहेरून आलेले काही जण दोन-तीन दिवसांपासून अहवाल आणि डॉक्‍टरांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना अशा वशिल्याने घरी सोडलेल्यांना मात्र नियम लागू नसल्याचे चित्र सीपीआरमध्ये पहायला मिळत आहे. 
याबाबत तक्रार केली तर आपल्यावरच कारवाई होईल, या भीतीने डॉक्‍टरांचाही नाईलाज झाला आहे. लोकप्रतिनिधींपेक्षा त्यांचे पीए किंवा त्यांचे नाव सांगून फोन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ऐन कामाच्यावेळी असे फोन येत आहेत. फोन नाही घेतले तरीही दुसऱ्या बाजूने डॉक्‍टरांवर दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे, अशी मागणी डॉक्‍टरांकडून होत आहे. 

.... किटली गरम 
दोन-तीन दिवसांपासून परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा येणाऱ्यांपैकी काहींना लगेच तपासणी करून सोडून द्यावे, असे फोन लोकप्रतिनिधी किंवा "चहापेक्षा किटली गरम' समजल्या जाणाऱ्या त्यांच्या पीएकडून डॉक्‍टरांना येत आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांनी आपल्या पीएकरवी दोन रुग्णांचे तातडीने स्वॅब घेऊन ते लगेच तपासून द्या व त्यांना सोडून देण्यासाठी मोठी ताकद लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT