doctor himself is getting corona positive 
कोल्हापूर

डॉक्‍टरच कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याने चिंता 

सुनील पाटील

कोल्हापूर : कोरोना व्यतिरिक्त ताप, सर्दी, खोकला यासह इतर आजारावर उपचार सुरु राहावेत, यासाठी ग्रामीण भागातील खासगी डॉक्‍टरांचे दवाखाने सुरु करण्याचे आदेश दिले. दवाखाने सुरू न करणाऱ्या डॉक्‍टरांवर कारवाईचा इशारा दिला. पण आता अशा दवाखान्यातून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी गडहिंग्लजमधील एका डॉक्‍टरसह भादवणमधील एका डॉक्‍टरच्या पत्नीला झालेल्या कोरोनामुळे अशा दवाखान्यात योग्य ती सुरक्षितता घेतली जाते की नाही ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

खासगी दवाखाने सुरु राहिलेच पाहिजे, पण आता दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर करणे सक्तीचा आहे. आता या सर्व सुरक्षा साधनांचा प्रत्यक्ष वापर करावा लागणार असल्याचे चित्र आहे. 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाला. तेव्हापासून शहरासह उपनगर व गावागावातील खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पुढाकार घेवून किमान ताप, सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारावरील उपचार तर स्थानिक पातळीवर व्हावेत, यासाठी हे दवाखाने सुरु केले. याला खासगी डॉक्‍टरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सुमारे दोन हजारहून अधिक दवाखाने सुरु आहे. दवाखाने सुरु आहेत ही चांगली बाब आहे. आता दवाखान्यात जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाने मास्क, सॅनिटायझर वापर करावा लागणार आहे. दक्षता घ्यावी लागणार आहे. 

महिन्यापूर्वी कसबा बावडा येथील एका दवाखान्यात कोरोना बाधित महिला रुग्ण गेली होती. त्यानंतर तेथे लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी मोठी तारांबळ उडाली. याशिवाय, रंकाळा टॉवर येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्‍टरला कोरोना झाला आहे. आता गडहिंग्लजमधील एका डॉक्‍टरला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता एक तर डॉक्‍टरांना किंवा त्यांच्याकडे जाणाऱ्या रुग्णांना कोरोना झाल्याचे यातून स्पष्ट झाले. पण गावा-गावातच नव्हे पण शहरातील अनेक दवाखान्यामध्ये एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जात नाही.

गावातील डॉक्‍टर ज्या ठिकाणी लोकांची तपासणी करतात. त्या एकाच जागेत दहा ते पंधरा लोक बसलेले दिसून येत आहेत. यासाठी, दवाखान्यात लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी लोकांना सांगितले पाहिजे. तरच जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्यास काही प्रमाणात का असेना पण मदत होणार आहे. 

दुसऱ्यांना आजार होवू नये, यासाठी जी माहिती देतो. त्याचे पालन डॉक्‍टरांनी स्वत:ही करायला हवी. ग्रामीणमधील दवाखाने सुरु राहिले पाहिजे. पण दवाखान्यात येणाऱ्या लोकांसह डॉक्‍टरांनीच काळजी घेणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. योगेश साळी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : तत्कालीन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचा सुद्धा दुबार मतदान यादीत नाव

SCROLL FOR NEXT