doctor made a short film on Corona 
कोल्हापूर

पिंपळगावच्या डॉक्‍टरने बनवली कोरोनावर शॉर्टफिल्म 

संजय खोचारे

पिंपळगाव :  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले अनेक दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळातदेखील रुग्णसेवा सुरू ठेवत येथील डॉ. संभाजी जगताप यांनी कोरोनाबाबत जनजागृती करणारी व सध्याच्या कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगात येत असलेल्या होमिओपॅथिक औषधाच्या वापराचे महत्व सांगणारी "अर्सेनिक अल्बम 30' या शॉर्टफिल्मची निर्मिती केली असून या शॉर्टफिल्मचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

कोरोनाबाबत प्रादुर्भाव टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी याबाबत सर्वस्तरांतून जागृती होत असतांनाही काही लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाबत वेळीच दक्षता घेणे गरजेचे असल्याचा चांगला संदेश देण्याचा तसेच सध्या या आजारावर "अर्सेनिक अल्बम 30' हे होमिओपॅथीक हे औषध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगल्या प्रमाणात उपयोगी येत असून या विषयावर भाष्य करणारी ही शॉर्टफिल्म आहे. 

डॉ. संभाजी जगताप यांचे पिंपळगाव (ता. भुदरगड) येथे नवजीवन हॉस्पिटल आहे. कोरोना आजाराच्या काळाशी सुसंगत अशी कथा या शॉर्ट फिल्ममध्ये मांडण्यात आली आहे. युट्युबवर या शॉर्टफिल्मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शॉर्टफिल्मची कथा, लेखन, निर्मिती व सहभाग या सर्व बाबी स्वतः च सांभाळत डॉ. जगताप यांनी डबल रोलची भूमिका साकारली आहे. या चित्रीकरणात पत्नी डॉ. संपदा, मुलगी सलोनी व सुहानी यांनीही सहभाग घेतला आहे. गतवर्षी त्यांनी स्वतः दिगदर्शित पिंपळगावमधील स्थानिक कलाकारांना घेऊन गावात व परिसरात चित्रीकरण करून "हुंबाड्या' या चित्रपटाची उत्कृष्ट अशी निर्मिती केली होती. लॉकडाऊनचा सदुपयोग करत कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. 

दृष्टिक्षेप 
- कोरोनाबाबत दक्षता घेण्याबाबचा संदेश 
- "अर्सेनिक अल्बम 30'च्या उपयोगावर भाष्य 
- डॉक्‍टरांच्या कुटुंबाचा सहभाग 
- शॉर्टफिल्मला युट्यूबवर चांगला प्रतिसाद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT