doctor Saved the baby with the mother in kolhapur 
कोल्हापूर

डाॅक्टर जणू देवदूत म्हणूनच धावले; जीवघेण्या प्रसंगातून मातेसह बाळाला वाचविले 

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) - मराठीत एक म्हण आहे 'बाळंतिणीच्या कळा बाळंतीलाच कळतात" केवळ ती माता होणार म्हणून जीवघेणी कळ सोसत असते. अशाच अवेळी सुटलेल्या कळा आणि सहाव्या महिन्यातच 108 रुग्णवाहिकेत झालेली प्रसूती. मातेसह बाळाचा वाचवलेला जीव. हा थरार आजच्या पहाटेने अनुभवला. अवचितवाडी ( ता. राधानगरी) येथील महिलेची सहाव्या महिन्यातील गर्भारपणातून सुटका राशिवडे 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर संग्राम शिंदे आणि चालक सचिन भोसले यांनी केली आणि ते देवदूत म्हणूनच त्या मातेला लाभले.

घडलं असं अवचितवाडी ही तुळशी खोऱ्यातील अत्यंत दुर्गम परिसरातील वाडी. काल अचानक येथील या महिलेच्या पोटात दुखू लागले. सहावा महिना संपत असल्याने सोळांकूर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी उपचार केले, मात्र वेळेआधीच होणारा रक्तस्त्राव आणि प्रसूतीच्या कळा यामुळे डॉक्टरांनी पुढे जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी 108 गाडीला फोन केला. राशिवडे येथे ड्युटीवर असलेले डॉक्टर शिंदेे यांनी सोबत येण्यास तयार असल्याचे सांगितले. पण काहीही करून तिथून गाडीतून महिलेला घेऊन पुढे या आम्ही वाटेत घेतो असा संदेश दिला.

राशिवडेतून अंतर तब्बल 25 किलोमीटरचे. अखेर सरवडेच्या पुलाजवळ त्या महीलेला गाडीमध्ये घेतले. डॉक्टर शिंदे यांनी कोल्हापूरचा प्रवास सुरु केला. कोल्हापुरात अनेक दवाखाने शोधले पण कोविंड आणि अन्य कारणामुळे मिळाले नाहीत. अखेर एका खासगी हॉस्पिटलमध्ये बाळावर आणि सावित्रीबाई फुले दवाखान्यात मातेवर उपचार सुरु आहेत. सेवेशी प्रामाणिकपणा आणि वेळेचे गणित मांडून, प्रसंगावधान राखून डॉ. शिंदे व चालकाने केलेले हे धैर्य एका मातेला आणि बाळाला नवा प्रकाश देऊन गेले आहे. आज पहाटे तीन वाजता हा घटनाक्रम एका माळावर नीरव शांततेत घडला. एकीकडे पहाटेचे तांबडे फुटत असताना दुसरीकडे माता आणि त्या बाळाच्या जीवनातही प्रकाश निर्माण होत होता.

मध्यरात्री आम्ही गेलो आणि वाईट परिस्थितीत मातेला आम्ही ताब्यात घेतले. प्रसंग अत्यंत दयनीय आणि नाजूक होता. सहा महिन्याच्या गर्भारपणात बाळंत होणे आणि मुल जिवंत राहणे हे दुर्मिळ असते. आम्ही प्रयत्न पणाला लावले ते मातेसह बाळाला वाचवण्यासाठी.

-डॉ. संग्राम शिंदे

संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT