doctor women and three cases are corona positive today in ajara kolhapur 
कोल्हापूर

आजऱ्यात डॉक्टरसह तिघेजण कोरोना बाधित

सकाळ वृत्तसेवा

आजरा : आजरा शासकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरसह तिघेजण कोरोना बाधित झाले आहेत. आजरा ग्रामीण रुग्णालय मधील एका महिला डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. सदर महिला डॉक्टर सध्या आजरा कोवीड सेंटर येथे रुजू होत्या. या महिला डॉक्टर निपाणी येथील असून त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. याच कुटुंबातील एक लहान मुलगा निगेटिव्ह आला आहे.

आजरा कोविड सेंटर येथील लॅब टेक्नीशियन यांचाही कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. या कर्मचाऱ्याच्या भावाचा संपर्क एका कोरोना रुग्णांशी आल्याचे समजते. त्यामुळे हा कर्मचारी आपल्या भावाच्या संपर्कातून कोरोना पॉझीटीव्ह आल्याचे समजते. सदर कर्मचारी राधानगरी येथील असून तेथेच कोविड सेंटर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

तर उर्वरित दोघांमध्ये एका परिचारिकेचा आणि एका शिपायाचा समावेश आहे. या परिचारिका देखील कोविड सेंटर येथे कामास असल्याचे समजते तर शिपाई यांचा मुलगा कोविड सेंटर येथे कामास असल्याचे समजते. खबरदारी म्हणून आजरा ग्रामीण रुग्णालय येथे औषध फवारणी आणि साफसफाईसाठी रुग्णालय दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तर फक्त तातडीच्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालय येथे सेवा दिली जाणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT