Dog Care Center to be set up in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात होणार डॉग केअर सेंटर 

युवराज पाटील

कोल्हापूर :  एरव्ही एखाद्या कुत्र्याला अपघात झाला आणि त्यातून दुखापत झाल्यास तर उपचार करणारी यंत्रणा सध्या आस्तित्वात नाही. जनावरांच्या दवाखान्यात अन्य पक्ष प्राण्यांवर उपचार होतात. मात्र, कुत्र्यासाठी अशी व्यवस्था नाही. ती कसर भरून काढण्यासाठी महापालिका लवकरच डॉग केअर सेंटर सुरू करणार आहे.

भटक्‍या कुत्र्यांची समस्या दिवसेदिवस तीव्र होत आहे. या पार्श्‍वभूमीवर दुखापत झालेल्या कुत्र्यांना सावरण्याचा प्रयत्न होणार आहे. गल्लीबोळात एखादे कुत्रे लंगडू लागले की त्याच्या पायावर कुणीतरी मार दिला आहे अथवा अपघात तरी झाला आहे असा तर्क बांधला जातो. पुढे या कुत्र्यांचे काय होते हे कुणाला ठाऊक नसते.

बऱ्याचवेळी रात्री कुत्री चारचाकी गाडीच्या खाली पहुडलेली असतात. सकाळी गाडी मागे पुढे करताना कुत्र्याच्या पायावर चाक जाण्याची शक्‍यता अधिक असते. कुत्रे ओरडल्यानंतरच त्याच्या अंगावर गाडी गेल्याची जाणीव मालकाला होते. 
पाळीव कुत्र्यांची काळजी त्यांचे मालक घेतात. मात्र, भटक्‍या कुत्र्यांची काळजी घेतली जात नाही. गंभीर दुखापत असल्यास त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. किमान त्याचा जीव तरी वाचावा यासाठी केअर सेंटर उभारले जाणार आहे. यासाठी महापलिकेने पन्नास लाखांची तरतूद केली आहे. सध्या केअर सेंटरसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. 

लॉकडाउनमुळे डॉग स्कॉडचे काम सध्या बंद आहे. गल्लोगल्ली त्रास देणाऱ्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निबिर्जीकरण व लसीकरण केले जाते. दोन ते तीन दिवसांनतर पुन्हा या कुत्र्यांना आहे त्या ठिकाणी सोडले जाते. महापालिकेने अलीकडे मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. 

भटक्‍या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. कुत्र्याच्या शेपटीजवळ विशिष्ट प्रकारची चीप बसविली जाईल. त्यानुसार संबंधित कुत्र्याचे लसीकरण कधी झाले याची माहिती मिळणार आहे.

दुखापत झालेल्या कुत्र्यांवर नियोजित केअर सेंटरमध्ये उपचार होतील. दुखापत किरकोळ असो अथवा गंभीर त्यावर उपचार करण्यास मदत होणार आहे. सध्या केअर सेंटरसाठी उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. 
- विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT