Donewadikar's Boat Has Been Closed For Six Months Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

डोणेवाडीकरांची होडी सहा महिन्यांपासून बंद

दिनकर पाटील

नेसरी : नेसरी-डोणेवाडी दरम्यान काशिलिंग मंदिरशेजारी घटप्रभा नदीवर अनेक वर्षांपासून नागरिकांचा होडीतून प्रवास सुरू आहे पाच-सहा महिन्यांपासून होडी बंद असल्यामुळे डोणेवाडीकरांचे हाल होत आहेत. प्रशासनाने तत्काळ लक्ष देउन होडी सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

डोणेवाडीकरांची साकववजा पुलाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. डोणेवाडीकरांना आजही होडीतून धोकादायक प्रवास करावा लागता आहे. पावसाळ्यात हाल होतात. सध्या डोणेवाडीकरांचा आधार असलेली होडी बंद असून, ती नदीकाठाला पडून आहे. डोणेवाडीकरांना बाजार, शिक्षण, आरोग्य, शेतीविषयक कामांसाठी नेसरीला ये-जा करावी लागते.

होडी बंद असल्याने डोणेवाडीकरांना नेसरीत येण्यासाठी हडलगे-तारेवाडी-नेसरी किंवा सांबरे-तावरेवाडी-कानडेवाडी-नेसरी असा आठ कि.मी.चा जादा फेरा पडत आहे. यामुळे वेळ, पैसा वाया जातो आहे. नेसरीकरांची जमीन डोणेवाडीच्या तर डोणेवाडीकरांची जमीन नेसरीच्या हद्दीत येत असल्याने शेतीकांमाबरोबरच सुगीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

होडीअभावी विद्यार्थी, महिला, रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. होडी सतत पाण्यात राहिल्याने वारंवार नादुरुस्त होते. घटप्रभा नदीला पूर आल्यास निम्यापेक्षा अधिक शेती पाण्याखाली जाते त्यावेळी होडी चालविणे जिकिरीचे बनते. साकववजा पुलाची मागणी पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी गट-तट बाजूला ठेवून प्रभावी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

डोणेवाडीकर अनेक वर्षापासून धोकादायक होडीचा प्रवास करत आहेत. सध्या होडीसुध्दा बंद असल्यामुळे आठ-दहा कि. मी.जादा फेरा मारून नेसरीशी संपर्क करावा लागतो. अनेक वर्षापासून प्रलंबित साकववजा पुलाची मागणी पूर्ण झाल्यास हा प्रश्‍न कायमचा सुटण्यास मदत होईल. 
- संतोष नाईक, ग्रामस्थ, डोणेवाडी

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Census: जनगणनेत जात सांगणं अनिवार्य नाही! देशात पहिल्यांदाच डिजिटल सेन्सस; ११ हजार ७१८ कोटी मंजूर

TAIT Exam 2025: भावी शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी! TAIT परीक्षेतील २,२०७ उमेदवारांचे निकाल रद्द

Pregnancy Prep 2026: पुढच्या वर्षी प्रेग्नेंसी प्लॅन करताय? मग 2025 संपण्याआधीच बदला 'या' ५ महत्त्वाच्या सवयी

Viral Video: देशाच्या पहिल्या डॉनची मुलगी त्रस्त; मोदी आणि शहांकडे न्यायाची मागणी, काय घडलं? पाहा भावनिक व्हिडिओ व्हायरल

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३९४६ मतदान केंद्रांची तयारी; प्रत्येक ९०० मतदारांसाठी एक केंद्र

SCROLL FOR NEXT