CCTV Footage Viral Sakal
कोल्हापूर

कोल्हापुरात गाढवांची दहशत! वृद्धाला धडक देऊन केले जखमी; घटनेचे CCTV Footage Viral

दत्ता लवांडे

कोल्हापूर : एक धक्कादायक माहिती समोर आली असून एका गाढवाने रस्त्याने जात असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला जोराची धडक दिली आहे. ही घटना कोल्हापुरात घडली असून गाढवाच्या या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन जात होता. तो वृद्ध असून त्याला तिथे उभा असलेला एक गाढव त्याला जोराची धडक देतो. त्यानंतर हा व्यक्ती खाली पडतो. तरीही गाढव त्याला टक्कर देत राहतो. गाढवाने या व्यक्तीच्या पायाला जोराचा चावा घेतला आहे.

या घटनेनंतर काही लोकं पळत येतात आणि गाढवाला मारतात. पण तरीही हा गाढव सदर व्यक्तीला मारत राहतो. बऱ्याच प्रयत्नानंतर आणि काही व्यक्तींनी जोरात काठीने मारल्यानंतर गाढव पळून जाते.

दरम्यान, गाढवाच्या या हल्ल्यामध्ये वृद्ध व्यक्ती चांगलाच जखमी झाला असून गाढवाने कोल्हापुरात चांगलीच दहशत माजवली आहे. प्रशासनाने या गाढवाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT