dont follow social distance in rural area kolhapur 
कोल्हापूर

'शेजारधर्म' नको गं माय... नाय तर कोरोना घरात येईल ना माय... 

अवधूत पाटील

गडहिंग्लज - भारतीय संस्कृतीत शेजारधर्माला मोठे महत्त्व. फ्लॅट संस्कृतीमुळे शहरात त्याचे अस्तित्व थोडे कमी झाले असले तरी ग्रामीण भागात मात्र ते अद्याप टिकून आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीत आता हाच शेजारधर्म अडथळा ठरत आहे. आजूबाजूच्या घरांमध्ये येण्या-जाण्यासह सुख-दुःखाच्या गुजगोष्टी, गप्पांचे फड रंगत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शेजारपाजाऱ्यांचाही संपर्क टाळण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत शेजारधर्म पाळा ऐवजी सोडा म्हणणेच योग्य ठरेल.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला. संसर्गातून पसरणाऱ्या या आजाराला थोपविण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या. शेवटी संचारबंदीचा टोकाचा निर्णय घेतला. नागरीकांकडून त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, लोकांनाच त्याचे गांभीर्य नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. होम क्वारंटाईन लोकांची समस्या तर वेगळीच आहे.

ग्रामीण भागात अजूनही शेजारधर्म पाळला जातो. या घरातील हाकेला त्या घरातून प्रतिसाद मिळतो. इकडे काय शिजले तर तिकडच्या घरातील लोकांच्या ताटात तो पदार्थ आढळतो. सुख- दुःखाच्या गुजगोष्टी तर नित्याचीच बाब आहे. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीचा यावर फारसा परिणाम झालेला नसल्याचे दिसून येते आहे. 
लोकांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे सुरू आहे. कामानिमित्त आणि अगदी काम नसतानाही. म्हणजेच काम नसल्याने रिकामा वेळ घालविण्यासाठी. मग त्याच ठिकाणी गप्पांचे फड रंगत आहेत. सायंकाळच्या सत्रात वृद्ध महिला शेजारीपाजारी जाऊन सुख-दु:खाच्या गुजगोष्टी करताना दिसत आहेत. यामाध्यमातून एकमेकांशी संपर्क वाढून कोरोना विषाणू पसरण्याचा धोका अधिक आहे. संचारबंदी म्हणजे केवळ रस्त्यावर फिरणे बंद करणे नव्हे तर एकमेकांशी थेट संपर्क तोडणे, हे समजून घेण्याची गरज आहे. नेमका त्याच गोष्टीला हरताळ फासला जात आहे.

तुलनेत गांभीर्य कमी...

कोरोना आणि त्यातून लागू झालेली संचारबंदीचे गांभीर्य शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमी असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडूनही शहरातच त्यांच्या कडक अंमलबजावणीवर जोर आहे. मात्र, बाहेर गावाहून आलेले जवळपास ८०-९० टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे लोकसंपर्क टाळण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT