Doping wrestler Risk of various diseases due to doping 
कोल्हापूर

डोपिंगचा डोस बेतू शकतो जीवावर; मल्लांनी स्टेरॉइड्स पासुन राहावे लांब

मतीन शेख

कोल्हापूर : कुस्ती हा मेहनतीचा खेळ. सरावा दरम्यानच्या कसरतीमुळे मल्लांच्या शरीराची झिज होत असते. ही झिज भरून काढण्यासाठी पूरक असा खुराक मल्लांना आवश्‍यक असतो. दूध, मांस, फळे, बदाम, पालेभाज्या असा संपूर्ण आहार ते घेतात; परंतु अलीकडच्या काळात या खुराकाला फाटा देत मल्ल प्रोटिन्स सप्लिमेंट अन्‌ स्टेरॉइड्‌सच्या वापराकडे अधिक वळले आहेत. यामुळे खेळाडूंना गंभीर दुष्परिणामाला सामोरे जावे लागत आहे.

वस्तादाने आखून दिलेला आहार व व्यायाम मल्लांनी पूर्ण करावा लागतो. पण याकडे दुर्लक्ष करत पैलवान मंडळींनी डोपिंगला जवळ केले आहे. यामागे विविध घटक काम करत आहे. स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्‍स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे डोपिंग खेळाडूंकडून केले जाते. इंजेक्‍शन, कॅप्सुल, टॅबलेट्‌स, पावडरच्या माध्यमातून याचे सेवन होते.

सततच्या वापरामुळे खेळाडूंना याची सवय लागते. महाराष्ट्रातल्या चांगल्या जोडीतले मल्ल डोपिंगच्या आहारी गेले आहेत. तर अनेकांना साईड इफेक्‍टसमुळे विविध व्याधींनी ग्रासले आहे.निवासी आखाड्यात राहणारे मल्ल, वस्ताद मंडळींना समजू न देता डोपिंग करत आहेत. वरिष्ठ मल्ल घेत असलेली इंजेक्‍शने आणि औषधे हेच कुस्तीतल्या यशाचं खरं गमक आहे, असा गैरसमज करून अगदी सोळा ते अठरा वर्षातील नवे मल्ल ही याचा प्रयोग करत आहेत. ही चिंतेची बाब आहे. इंजेक्‍शनची सुई टोचून घेण्याची पद्धती वरिष्ठ मल्लांनी लहान मल्लांनाही शिकवली आहे.

प्रोटिन्स सप्लिमेंट, स्टेरॉइड्‌सचा धंदाच...
बॉडीबिल्डिंग, ॲथलेटिक्‍स, वेटलिफ्टिंग यासारख्या खेळात सहभागी होणारे खेळाडू शरीराची झिज भरून काढण्यासाठी व खेळाच्या चांगल्या प्रदर्शनासाठी सप्लिमेंट आणि स्टेरॉइड्‌सचा वापर करतात. परंतु हळूहळू हे लोण कुस्ती क्षेत्रात शिरल्याने या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. खेळाडूंना प्रोटिन्स सप्लिमेंट गरजेनुसार घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. परंतु सध्या अनेक ठिकाणी सप्लिमेंटची दुकानेच उघडली आहेत.

न्युट्रिशिअन किंवा इतर कोणता वैद्यकीय परवाना नसणाऱ्यांनी हा उद्योग सुरू केला आहे. या प्रक्रियेत काही माजी मल्ल आहेत. नवख्या मुलांना कमी दर्ज्याचे सप्लिमेंट जास्त किमतीत विकण्याचा तसेच चोरट्या पद्धतीने स्टेरॉइड्‌स पुरवण्याचा अनेकांनी धंदाच सुरू केला आहे. अगदी दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यतच्यामागे साखळी काम करत आहे. खेळाडूंच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे.


 डोपिंगचे दुष्परिणाम...
यकृत, मूत्रपिंड निकामी होणे
वंध्यत्व येणे
उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होणे 
हृदयात ब्लॉकेज तयार होणे
लिगामेंट तुटणे

डोपिंग करणाऱ्या मल्लांमध्ये दुखापतीचे प्रमाण वाढत आहे.कुस्तीपटू घेत असले स्टेरॉइड्सचे डोस घातक ठरु शकतात.डोपिंगची सवय खेळाडूच्या जीवावर ही बेतू शकते.अतिरिक्त डोपिंगमुळे ह्रदयविकाराचा झटका तसेच ब्रेन हँम्रेज सारख्या धक्कादायक घटना घडू शकतात.मल्लांना डोपिंग पासून परावर्तीत करणे गरजेचे आहे. 
- डॉ.मनिष परदेशी, आंतरराष्ट्रीय फिजिओ थेरपिस्ट

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT