Rajashree-Chatrapati-Shahu-Maharaj-Government-Medical-College-Kolhapu 
कोल्हापूर

कोल्हापुरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता पदाचा पदभार डॉ.चंद्रकांत म्हस्के यांनी स्विकारला...

शिवाजी यादव

कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता पदी नांदेड हुन आलेले डॉ.चंद्रकांत म्हस्के यांनी आज पदभार स्विकारला. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना सीपीआर रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर ताण आहे, अशात प्रभारी अधिष्ठाता डॉ.आरती घोरपडे यांच्याकडे हे पद होते. त्यांच्याकडून डॉ.मस्के यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली घेत आजपासूनच सीपीआर रुग्णालयात उपचार सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात केलेली आहे.

गेल्या पाच दिवसापूर्वी डॉ. मस्के यांची कोल्हापुरात अधिष्ठाता पदी नियुक्ती झाल्याचे आदेश आले. मात्र त्यानंतर मस्के यांच्याशी संवाद होऊ शकला नव्हता. त्यामुळे ते कोल्हापुरात प्रभारी अधिष्ठाता पदाची सूत्रे स्वीकारतील की नाही याविषयी साशंकता व्यक्त होत होती. अशात आज सकाळीच ते येथे दाखल झाले व त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यानंतर सीपीआर रुग्णालयातील तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधत कोेरोनाची स्थिती जाणून घेत साडेबाराच्या सुमारास प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. गेल्या वीस दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या जवळपास अडीच हजाराने वाढली आहे. तर गेल्या साडेतीन महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या सहा हजार 5000 पर्यंत पोहोचली आहे तर 168 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील कोरोनाचे गांभीर्य दिवसागणिक वाढले आहे.

सीपीआर रुग्णालयात बेडची संख्याही अपुरी पडू लागलेली आहे. अशा स्थितीत गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये येणाऱ्या कोरोना बाधितांवरर उपचार कोठे करावेत असा प्रश्न आहे. याच बरोबर अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे व बाधित यांची संख्या जास्त असल्यामुळे उपचार सेवा अधिक सक्षम देण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना राबवल्या लागणार आहेत.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT