Dr. digambar shirke is new vice chancellor of shivaji university kolahpur from today 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे 13 वे कुलगुरू म्हणून माजी प्र-कुलगुरू डॉ. दिगंबर तुकाराम उर्फ डि.टी.शिर्के यांची निवड झाली. आज सायंकाळी 5 वाजता कुलपती कार्यालयाकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ 17 जूनला संपला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाचे चार जणांची शोध समिती नेमली होती. आलेल्या 169 अर्जातून 28 जणांची पहिली यादी करण्यात आली. त्यानंतर शोध समितीने यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून पाच जणांची अंतिम यादी बनवण्यात आली. 

कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी या पाच जणांच्या मुलाखती सोमवारी (12) घेतल्या. आज सायंकाळी त्यांनी डॉ. शिर्के यांची निवड जाहीर केली. शिर्के हे मुळचे हातकणंगले तालुक्‍यातील वाठार तर्फे वडगाव येथील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस.सी केले. त्यानंतर त्यांनी याच विद्यापीठातून एम.फील आणि पी.एचडी केली. त्यानंतर ते याच विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विभागप्रमूख, प्रभारी कुलसचिव, प्र-कुलगुरू या पदांवर त्यांनी काम केले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT