Dr P S Patil on shivaji university Vice-Chancellor 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांची निवड 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी फिजिक्स विभागातील प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांची निवड झाली आहे. विद्यापीठाचे ते सातवे प्र-कुलगुरू असून, सायन्स फॅकल्टीमधील पाचवे आहेत. त्यांच्या निवडीचे वृत्त शैक्षणिक वर्तुळात पोचताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

कुलगुरुपदी डॉ. डी. टी. शिर्के विराजमान झाल्यानंतर प्र-कुलगुरू कोण होणार, याची उत्सुकता विद्यापीठ वर्तुळात होती. डॉ. पाटील यांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केला होता. मात्र, पहिल्याच फेरीत त्यांचा अर्ज फेरीतून बाहेर पडला. परिणामी प्र-कुलगुरू पदावर विद्यापीठ आवारातील की संलग्नित एखाद्या महाविद्यालयातील प्राध्यापकाची वर्णी लागणार, असा विषय चर्चेत होता. मात्र, डॉ. पाटील यांच्या निवडीने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यांच्या निवडीचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातून बी.एस्सी. व एम.एस्सी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. ते १९९०ला न्यू कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते १९९५ ला विद्यापीठाच्या फिजिक्स विभागात कार्यरत झाले. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर २१९, राष्ट्रीय २५ व राज्य स्तरावर ११ शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २८ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली असून, १४ विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन काम करत आहेत. चार विद्यार्थी एम.फिल. झाले आहेत. स्कूल ऑफ नॅनो सायन्सचे समन्वयक म्हणून ते सध्या काम पाहत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT