Dr Prakash Bandivadekar arrested for ransom kolhapur news 
कोल्हापूर

डॉ. प्रकाश बांदिवडेकरला खंडणीप्रकरणी अटक...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - क्रशर व्यावसायिक महिलेकडे ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्ह्यात आज चंदगड येथील संशयित डॉ. प्रकाश बांदिवडेकरला गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील ही दुसरी अटक असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. 

पोलिसांनी याप्रकरणी दिलेली माहिती अशी - गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात १७ जानेवारीला क्रशर व्यावसायिक महिलेकडे ५० हजारांची खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. क्रशर व्यावसायिक साधना पाटील (रा. धारवाड) या जमिनीचे उत्खनन करणार होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील संशयित शंकर पाटील याने ५० हजारांची मागणी केली होती. त्यासाठी त्याने धमकी दिली होती, अशी फिर्याद साधना पाटील यांनी दिली होती.

वाचा - कोल्हापूर पोलिस राॅक्स 007 गॅंग शाॅक...

त्यानुसार संशयित शंकर पाटील याला अटक करण्यात आली होती. तपासात डॉ. बांदिवडेकर याचे नाव पुढे आले. त्याला काल रात्री इंदोर (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेतले. आज त्याला अटक दाखवली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावल्याचे सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. ही कारवाई चव्हाण यांच्यासह उपनिरीक्षक रवी गच्चे, कर्मचारी प्रदीप जाधव, उदय कांबळे, राकेश माने आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT