dr shrimant kokate comment on graduate election 
कोल्हापूर

ही पदवीधरची निवडणूक आहे, आता माघार नाही ; डॉ. श्रीमंत कोकाटे 

सुनील पाटील

कोल्हापूर - ही निवडणूक साखर कारखान्यांची नाही, तर सुज्ञ पदवीधरांची निवडणूक आहे. कोणाला निवडूण द्यायचे हे पदवीधरांनी आधीच ठरवले आहे. ज्या काळात काहीजण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना फितूर झाले होते. त्यावेळी, आम्ही भाजप आणि आरएसएस विरुध्द बंड पुकारले होते. दोन वर्षापासून पदवीधरांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आता माघार नाही, तर पदवीधरांच्या हितासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

डॉ. कोकाटे यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मागितली होती. अरुण लाड आणि डॉ. कोकाटे हे या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, राष्ट्रवादीकडून काल अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कोकाटे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

डॉ. कोकाटे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून पदवीधरांची नाव नोंदणी, त्यांच्या समस्या जाणून घेणे, ज्यावेळी या मतदार संघाकडे पाहत नव्हते, त्यावेळेपासून आपण पदवीधरांच्या संर्पकात आहोत. त्यांच्या सर्व अडचणी माहिती आहेत. त्याचा स्वतंत्र अजेंडा घेवूनच ही निवडणूक लढवणार आहे. पदवीधर हे सुज्ञ आहे. त्यांना त्यांच्या मागण्या किंवा अडचणी दूर करणारा उमेदवार माहिती आहे. पदवीधरची निवडणूक म्हणजे साखर कारखान्याची निवडणूक नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्‍यात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले पाहिजे. गावगावात उच्च शिक्षित अधिकारी तयार झाला पाहिजे, हाच उद्देश ठेवून निवडणूक लढविली जाईल. तरुणांच्या हातात लेखनी आणि पुस्तक द्यायचे आहेत. त्यादृष्टीनेच वाटचाल केली जाईल. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिड लाख पदवीधरांची नोंदणी केली असल्याचेही डॉ. कोकाटे यांनी सांगितले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

Pune News: वाहनांची तपासणी आता अवघ्या सहा मिनिटांत;‘आरटीओ’चे स्वयंचलित चाचणी केंद्र एक मार्चपासून सेवेत, वेळेची हाेणार बचत!

Dive Ghat Pune Traffic Update: दिवेघाटात उद्या दोन तास वाहतूक बंद; आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील रुंदीकरणासाठी निर्णय!

SCROLL FOR NEXT