Drone counting of village land at Bamani begins 
कोल्हापूर

ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे अचूक मालमत्ता पत्रक ः मंत्री हसन मुश्रीफ

पंडित कोईगडे

सिद्धनेर्ली,कोल्हापूर ः ड्रोनद्वारे गावठाण मोजणी झाल्यानंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित अचूक मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायतीस होईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 
बामणी (ता.कागल ) येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी योजनेचा प्रारंभ श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते ड्रोन उडवून करण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सभापती पुनम मगदूम, जिप सदस्य अंबरिष घाटगे, उपविभागीय अधिकारी रामहरी भोसले, तहसिलदार शिल्पा ठोकडे, भूमि अभिलेख विभागाचे अधीक्षक वसंत निकम, सरपंच रावसाहेब पाटील आदी बामणी उपस्थित होते. 
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ड्रोनद्वारे गावठाणांचे सीमांकन केल्यामुळे गावठाणातील प्रत्येक घराचा, खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा तयार होईल. गावातील मालमत्तांचे सीमांकन करण्यासाठी ग्रामपंचायतीस येणारा खर्च पंधाराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या अबंधीत अनुदानातून करण्यास परवानगी दिली जाईल. गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी ग्रामपंचायतीना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार देण्यात येणार आहे.'' 
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गावठाण वाढ झाली असून त्याची मोजणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबविले जात असून या अभियानातून जनतेची प्रलंबित कामे मार्गी लावली जात आहेत.'' 
 
गावठाण भूमापनचे फायदे 
- प्रत्येक धारकाचे जागेचा/मिळकतीचा नकाशा तयार होईल व सीमा निश्‍चित होतील व मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल. 
- प्रत्येक धारकाला आपले मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका व सनद मिळेल 
- बांधकाम परवानगीसाठी मिळकत पत्रिका आवश्‍यक आहे.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: भारताविरुद्ध जिंका, नाहीतर गाशा गुंडाळा, पाकिस्तानसमोर 'करो वा मरो'ची परिस्थिती; जाणून घ्या समीकरण

Bank Merger: सर्वात मोठा बँकिंग निर्णय! सार्वजनिक क्षेत्रातील 'या' दोन बँकांचे महाविलीनीकरण होणार; इतिहासात नवा अध्याय

BMC Mayor: मुंबई महापालिकेचा महापौर कधी ठरणार? नवी तारीख आली समोर

Union Budget 2026: बजेट 2026 मध्ये आरोग्य क्षेत्राला मोठी अपेक्षा; खर्चवाढ, पायाभूत सुविधा आणि परवडणाऱ्या उपचारांवर लक्ष देण्याची मागणी

Nashik News : निमाणी बसस्थानक आता रिकामे! १ फेब्रुवारीपासून सर्व बस तपोवन डेपोतून सुटणार

SCROLL FOR NEXT