Drunk youth beat truck driver tourists riot in Malkapur police crime kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur News : मलकापुरात मद्यधुंद पर्यटकांची हुल्लडबाजी; ट्रकचालकाला विनाकारण मारहाण

पावसाळा सुरू झाल्याने अनेक पर्यटक तालुक्यातील बर्की, केर्ली, मानोली, पालेश्वर, आंबा या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी येत आहेत

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर : तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मद्यधुंद तरुणांनी आज येथील मंगळवार पेठेत ट्रकचालकाला विनाकारण मारहाण केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी परिस्थिती पाहून वातावरणातील तणाव निवळला.

दरम्यान, येथे पोलिस चौकी असताना पोलिस प्रशासन नेमके असते कोठे? अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या. पावसाळा सुरू झाल्याने अनेक पर्यटक तालुक्यातील बर्की, केर्ली, मानोली, पालेश्वर, आंबा या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी येत आहेत.

मात्र दुचाकीवरून येणाऱ्या तरुण पर्यटकांची मद्यधुंद अवस्थेतील पर्यटनवारी स्थानिक नागरिक व छोट्या व्यापाऱ्यांना अधिक त्रासदायक ठरू लागली आहे. मुख्य रस्त्याबरोबरच वर्दळीच्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेतील पर्यटक वाहनधारकांना त्रास देत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्‌भवत आहेत.

आज सायंकाळी येथील मंगळवार पेठेत मद्यधुंद अवस्थेतील दुचाकीस्वारांनी ट्रक चालकाला विनाकारण मारहाण केली. याचे पडसाद बाजारपेठेत उमटले. वादावादीमुळे वाहतूक कोंडी झाली. मार्गावर वाहनांच्या रांगा झाल्या. नागरिकांच्या सर्तकतेमुळे मद्यधुंद दुचाकीस्वारांनी परिस्थिती पाहून पलायन केल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने शाळी नाका प्रवेशद्वारावरच अशा हुल्लडबाजांना आवर घालून आबालवृद्ध व महिलांना होणारा नाहक त्रास थांबवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT