Due to the lockdown, the workers went to help the robot 
कोल्हापूर

लॉकडाऊनमुळे कामगार गेले रोबो आले मदतीला

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर  ः परप्रांतीय कामगार मुळ गावी गेल्यामुळे उद्योगनगरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. यावर उद्योजकांनी रोबोटिक्‍स यंत्रावर भर देण्याचा उपाय केला आहे. जिल्ह्यात सध्या चार ते पाच टक्के उद्योजकांकडे रोबोटिक्‍स हे तंत्र वापरले जात आहे. वेल्डींग, फिटिंग, पार्ट सुटे करणे यासह अनेक कामे या रोबोटिक्‍सद्वारे केली जात आहेत. हेच तंत्र आता आखणी वाढवून कामगारांचा तुटवडा भरून काढण्याचे नियोजन सुरू झाले आहे. 
कोरोना विषाणुमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सुमारे पन्नास हजारांहून अधिक परप्रांतीय मजूर त्यांच्या मुळ गावी गेले आहेत. ते परत येतील की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. अनेकांनी पुन्हा येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र ते येतील याची खात्री नाही. परिणामी लॉकडाऊन नंतर पुन्हा गती पकडण्यासाठी जिल्ह्यातील उद्योगनगरीत रोबोटिक्‍स यंत्राचा वापर केला जाणार आहे. 
जपान मधील सर्वाधिक वेगवान रेल्वेला ज्या कंपनीचे ब्रेक्‍स आहेत, त्या कंपनीकडून दहा-बारा रोबोटिक्‍स आणण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. सध्या या उद्योजकाकडे दोन रोबोटिक्‍स यंत्राद्वारे काम सुरू आहे. या रोबोटिक्‍स यंत्रामुळे प्रत्येक काम हे परफेक्‍ट होते. दहा व्यक्तींचे काम एक रोबोटिक्‍स यंत्र करत असल्याचा त्यांचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. 
जपान, युरोप, अमेरिका येथे या पद्धतीचे यंत्र मोठ्‌या प्रमाणात वापरले जात आहे. ज्या ठिकाणी कामगारांचा तुटवडा जाणवतो त्या ठिकाणी रोबोटिक्‍सचा वापर झाल्याचे जगभरात दिसून येते. दहा किलोपासून ते 15 टनापर्यंतचे रोबोटिक्‍स सध्या तयार आहेत. त्यांची किंमत ही पंधरा लाखांपासून वीस कोटींपर्यंत आहे. जिल्ह्यातील काही उद्योजकांनी याचा वापर गेली काही वर्षे सुरू केला आहे. मात्र कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या कामगार तुटवड्याच्या काळात हेच यंत्र पर्याय ठरत आहेत 


""आमच्या कंपनीमध्ये सध्या दोन रोबोटिक्‍स यंत्र आहेत. रोबोट मानवासारखी सर्व कामे करू शकतो. त्याच्यासाठी केवळ एकदाच एक टिचर आणि प्रोग्रॅमर आवश्‍यक असतो. कामगार टंचाईवर सध्या रोबोटिक्‍स आणि ऍटोमेशन (स्वयंचलीत) हाच पर्याय आहे.' 
प्रकाश राठोड, उद्योजक 

""आमच्या कंपनीत वेल्डींगसाठी रोबोटिक्‍सचा वापर केला जात आहे. त्याचे काम परफेक्‍ट असते. मनुष्य विरहीत काम होऊ शकते. भविष्यात कामगारांच्या तुटवड्यावर रोबोटिक्‍सचा वापर वाढवावा लागणार आहे. 
- दिनेश बुधले, उद्योजक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT