duplicate note of 50 rupees fraud case arrested police to mother and her son in nrusinhawadi kolhapur 
कोल्हापूर

बनावट नोट पन्नासची अन् गाठ पडली पोलीसांशी

सकाळ वृत्तसेवा

नृसिंहवाडी (कोल्हापूर) : पन्नास रुपयांची बनावट नोटा खपवणाऱ्या मायलेकास ग्रामस्थांनी काल सायंकाळी पाचच्या सुमारास पकडले. याबाबत रात्री उशिरापर्यंत शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

या बाबत पोलिस आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी : बाजारपेठ परिसरात कोल्हापूर परिसरातील मायलेक दत्त दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर या दोघांनी 
बाजारपेठेतील दुकानामध्ये पन्नास रुपयांची नोट देऊन खरेदी करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे पाच ते सहावेळा खरेदी घडली. त्याचा दुकानदारांना संशय आला. यावेळी पन्नास रुपयांची नोट बघितल्यावर ती नोट बनावट असल्याचा संशय आला.

दुकानदारांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दुकानदारांनी एकत्रित येऊन या मायलेकांना शिरोळ पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत रात्री उशिरापर्यंत शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी कारवाईमध्ये दिरंगाई न करता बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी करीत आहेत.

"त्या दोघांकडून जप्त केलेल्या नोटा बनावट आहेत. तपासणी मशिनच्या साह्याने या नोटा तपासण्यात येत आहेत. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे."

- शिवानंद कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक, शिरोळ ठाणे

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT