E commerce companies are banned from selling nothing essential commodities 
कोल्हापूर

ई - कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तू शिवाय अन्य वस्तू विकण्यास बंदीच...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - भारतातील ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंच्या बरोबरीने, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच अन्य वस्तू विकण्यास परवानगी दिली होती.या निर्णयामुळे देशभरातील व्यापारी वर्गांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती देशभरातील व्यापार्‍यांची शिखर संस्था 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' (कॅट) च्या वतीने या निर्णयास तीव्र विरोध नोंदविण्यात आला होता. या विरोधाची दखल घेऊन केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने ई - कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तू शिवाय अन्य वस्तू विकण्यास दिलेली परवानगी रद्द केली असून, आता ई-कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करता येणार आहे,अशी माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे  राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली..

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया व राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी यासंदर्भात देशाचे पंतप्रधान,अर्थमंत्री व गृहमंत्री यांना व्यापारयांमधील तीव्र नाराजीची कल्पना देऊन हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची आग्रही मागणी केली होती.हा निर्णय लागू होण्याच्या एक दिवसांपूर्वीच सरकारने ही परवानगी काढून घेतली असून आता त्यांना ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तू शिवाय अन्य वस्तू विकता येणार नाही.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयाचे देशभरातील व्यापाऱ्यांनी स्वागत केले असल्याची माहितीही राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT