कोल्हापूर

जोतिबाची ई-पास दर्शन सुविधा बंद करा; पुजारी, ग्रामस्थांतून मागणी

जोतिबा डोंगर येथे नवरात्रौत्सवापासून जिल्हा प्रशासनाने भाविकांसाठी ई-पास दर्शन व्यवस्था सुरु केली आहे.

निवास मोटे

जोतिबा डोंगर येथे नवरात्रौत्सवापासून जिल्हा प्रशासनाने भाविकांसाठी ई-पास दर्शन व्यवस्था सुरु केली आहे.

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : 'श्री क्षेत्र जोतिबा डोंगर' येथे जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली ई-पास दर्शन व्यवस्था बंद करून परंपरेने सुरू असणारी दर्शन व्यवस्था सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ, पुजारी, हक्कदार पुजारी, उत्कर्ष समितीच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्‍वासन ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांना दिले आहे.

जोतिबा डोंगर येथे नवरात्रौत्सवापासून जिल्हा प्रशासनाने भाविकांसाठी ई-पास दर्शन व्यवस्था सुरु केली आहे. यामुळे अनेक भाविकांना त्रास होत आहे. या सुविधेमुळे अनेक भाविक गोंधळूनही जातात. वयोवृद्ध भाविकांना केवळ कळस दर्शन घेऊन परतावे लागत आहे. दरम्यान ई-पास अजून पंधरा दिवस सुरू ठेवणार असल्याचे देवस्थान समितीने नुकतेच जाहीर केले आहे. परंतू या व्यवस्थेला येथील ग्रामस्थ, पुजारी व गुरव समाजाचा विरोध आहे.

ई-पास दर्शन नियोजनामुळे जोतिबा डोंगर येथे अवलंबून असणाऱ्या अर्थिकतेला बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे ई-पास दर्शन व्यवस्था कायमस्वरूपी बंद करून परंपरागत सुरू असलेली दर्शन रांग सुरू करावी अशी मागणी केली आहे. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे. यावेळी सरपंच राधा बुणे, कृष्णात बुणे मच्छिंद्र बुणे, हक्कदार समितीचे अध्यक्ष नवनाथ लादे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: दहा औषध उत्पादकांचे परवाने रद्द; ४३४ संस्थांची तपासणी; १३५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे ‘मुख्य नेता’पद आधारहीन; उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात दावा

Delhi to Pune SpiceJet विमानात नेमकं काय घडलं? प्रवाशांना श्वास घेणंही कठीण, विमान रणवेवर पोहोचलं अन् प्रवाशांनी उड्डाणच रोखल

Marathi News Live Updates : रीलच्या नादात १६ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Maharashtra Agriculture Department: कृषी विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; सतरा वर्षांनंतर फेररचना; २,६६८ नवीन पदांची निर्मिती

SCROLL FOR NEXT