e passes are still compulsory in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात ई-पासची सक्ती कायम ; काय आहे कारण?

सुनील पाटील

कोल्हापूर : एका जिल्ह्यातून किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी सुरु असणारे ई-पास रद्द करण्याच्या सूचना केंद्रीय गृहसचिवांनी दिले आहेत. मात्र, राज्यात अजून या निर्णयाची अमंलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी एका-जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी खासगी वाहनांना ई-पास सक्तीचाच आहे. 

राज्यातील आणि परराज्यातील प्रवासासाठी ई-पास घेतला जात होता. लोकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचा केला आहे. दरम्यान, काल गृहसचिवांनी हे सर्व ई पास रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यातही ई-पास रद्द झाले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार, अशी पोस्ट सोशलमिडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. 

आजही या पोस्ट अविरतपणे मोबाईलच्या अलर्ट टोन वाजवत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने सध्या तरी ई-पास रद्द केलेला नाहीत. त्यामुळे एस.टी. बस वगळता इतर खासगी वाहनांना ई-पास अजूनही सक्तीचाच आहे. काल रात्री उशीरापर्यंत आणि आज सकाळीही ई-पास रद्दच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. 

अद्याप सुचना नाहीत 

"राज्य शासनाकडून ई-पास रद्दच्या कोणत्याही सूचना जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी ई-पास सुरुच राहतील. ज्यावेळी ई-पास सुचना येतील त्यावेळी, याची माहिती दिली जाईल."

- जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT