Edible cutlery cups production mechanical student success story kolhapur 
कोल्हापूर

चहाप्रेमींसाठी बाजारात आला नवा कप; तीन युवकांच्या Invention मुळे आराेग्य राहणार ठणठणीत

मतीन शेख

कोल्हापूर : चहा हे आपलं आवडतं पेय.चहा बरोबर बिस्किट खाणं हे एक समिकरणच पण चहा पिण्याबरोबर  कप ही खाता येणार आहे. थोडं वेगळ वाटताय. ही पण एक गंमत आहे. 'युज अँण्ड थ्रो' ही संकल्पना अधिक वाढत असताना चहाचे कागदी व प्लॅस्टिकच्या कपांचे बाजारात पेव फुटले आहे.परंतु या कपातील चहामुळे मानवी शरिरावर घातक परिणाम होऊ शकतात असे संशोधन समोर आले आहेत. या कपांना पर्याय म्हणुन कोल्हापुरातील तीन उच्चशिक्षित तरुण मित्रांना सुचली एक युक्ती यांनी एकत्र येत तयार केला 'इडीबल कटलरी कप' हा नेमका कप आहे तरी काय चला घेऊया जाणून..


मेकँनिकल इंजिनियर असलेल्या दिग्विजय गायकवाड या तरुणाला बिस्किट कपांची कल्पना सुचली.त्याने आपल्या आदेश कारंडे व राज खामकर या दोन इंजिनिअर मित्रांना ही कल्पना बोलुन दाखवली. आणि 'इडीबल कटलरी कप' अर्थात खाण्यायोग्य बिस्किट कपांची निर्मिती केली. नोकऱ्यांची  वाणवा असताना,नविन व्यवसाय उभा करण्याच्या  त्यांचा विचार पक्का झाला.आंध्रप्रदेश मधुन मिक्सिंग मशिन आणत त्यांनी या कपांचे उत्पादन सुरु केले आहे.

असा तयार होतो इडीबल कटलरी कप

मैदा,राईस पावडर,चॉकलेट पावडर, साखर यांचे एकत्रीत मिश्रण करत कपाच्या आकाराच्या साच्यात भरुन ते हिटींग मशिन मध्ये दहा मिनिटात कपांची निर्मिती होत आहे.

नव्या व्यवसायाला  मित्रांची  साथ

शहरातील चहा स्टॉलला हे कप पुरवले जात आहेत. दिवसाला जवळपास दिड ते दोन हजार कपांची विक्री ते करत आहेत.चहा स्टॉल बरोबर घरगुती कार्यक्रमात ही या कपांना मागणी मागणी होत होत आहे. तिघा मित्रांकडूनच या उत्पादनाचे मार्केटिंग केले जात आहे.या नव्या व्यवसायात त्यांना सिद्धार्थ बुधवंत व युवराज राऊत या मित्रांची ही साथ लाभली आहे.

 तरुणांना असा संदेश 

प्लॅस्टिकचे तसेच कागदी आरोग्याला हानी कारक आहेत.तसेच पर्यावरणाला धोका पोहोचवणारे आहेत.या कपांना फाटा देत.बिस्कीट कपांची निर्मिती करत नव्या व्यवसायासह पर्यावरण रक्षणाचा संदेश या तरुणांनी दिला आहे.

स्टार्ट अप सुरु करण्याचा  विचार

इंजिनिअरींगचे शिक्षण घेवुन ही नोकरीच्या मागे न लागता आम्ही तिघां मित्रांनी 'इडीबल कटलरी कप' निर्मिती केली. ही संकल्पना घेवुन माणसांचे आरोग्य तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे .या माध्यमातून नवा स्टार्ट अप सुरु करण्याचा आमचा विचार आहे.
दिग्विजय गायकवाड

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

Konkan Railway : कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

Latest Marathi News Live Update : कासारवाडीजवळ पीएमपीने तीन ते चार गाड्यांना उडवले

Fifa World Cup 2026 : यमाल दे धमाल! स्पेनच्या Lamine Yamal ने इतिहास घडविला; पेले यांच्यानंतर तोच... मेस्सीचाही विक्रम मोडला

Sangli Rain Update : किती मिलिमीटर पाऊस पडल्यावर करावी खरीप पेरणी? हंगामातील पेरणीचे 15 दिवस वाया, शेतकऱ्यांच्या हातात अजून किती दिवस शिल्लक?

SCROLL FOR NEXT