The education sector has also been hit hard by the lockdown 
कोल्हापूर

दहावी परीक्षेचे ग्रहण सुटेना ! विद्यार्थी, पालकांचा जीव टांगणीला...

राजेंद्र हजारे

निपाणी - 'कोरोना'च्या संसर्गामुळे समाजातील सर्वच घटकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामधून शिक्षण खातेही सुटलेले नाही. ऐन परीक्षेच्या काळातच हा संसर्ग सुरू झाल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण दहावी बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली होती. याबाबत ४ मे रोजी वेळापत्रक जाहीर होणार आहे. पण पुन्हा  १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याच्या धास्तीने विद्यार्थी व  पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

यंदा १ ली ते ९वी पर्यंत वर्गातील बर्‍याचशा परीक्षा रद्द झाल्याने यंदा निकालाची वर्दळ दिसून आली नाही.शैक्षणिक जीवनाच्या दृष्टीने दहावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. या काळात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी चांगले गुण मिळविण्यासाठी कष्ट घेतात. पण यंदा कोरोनामुळे या परीक्षा सतत पुढे ढकलत आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी वर्कफ्रॉम होम संकल्पना राबवून सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पण दिवसेंदिवस परीक्षांचा कालावधी पुढे जात असल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. तसेच पालकांची घालमेल दिसून येत आहे. परीक्षा होऊन उत्तर पत्रिका तपासानंतर निकाल लागण्यासाठीही मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाला विलंब लागणार आहे. एकंदरीत लॉकडाऊनचा मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे.
 

'लॉकडाउनमुळे दहावीच्या परीक्षा सतत पुढे ढकलत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जादा वेळ मिळाला असला तरी सर्वांसमोरच अभ्यासाचे टेन्शन उभे राहिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता परिक्षेला सामोरे जाण्याची तयारी करावी.'
- स्नेहा घाटगे, प्राचार्या, मॉडर्न इंग्लिश स्कूल, निपाणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT